TET Exam : ‘टीईटी’ अपात्र शिक्षकांवर होणार कारवाई? आमदार बंब यांनी मागवली राज्यभरातील माहिती tet exam right to information
शासन नियमानुसार TET परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय/तालुकानिहाय शाळेच्या नावांसह माहिती मिळणे बाबत…
छ त्रपती संभाजीनगर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या, ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे.
शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून (टीईटी) दरवर्षी भरती केली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली जाते. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाने २४ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनी ३० मार्च २०१९ पर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली आहे.
गुणवत्तेवर परिणाम
राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार, पात्रता परीक्षा न उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.