विभाज्यतेच्या कसोट्या 2 ते 11 पर्यंतच्या test of division 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभाज्यतेच्या कसोट्या 2 ते 11 पर्यंतच्या test of division 

2 ची कसोटी :

ज्या संख्येच्या एककस्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यांपैकी एखादा अंक असेल, तर त्या संपूर्ण संख्येस 2 ने निःशेष भाग जातो. उदा. 342, 464, 516, 658, 1000.

3 ची कसोटी :

ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस 3 ने निःशेष भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येस 3 ने निःशेष भाग जातो. 231, 732, 111 इत्यादी.

4 ची कसोटी :

संख्येच्या एकक व दशक स्थानांच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस जर 4 ने निःशेष भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येस 4 ने निःशेष भाग जातो.

जसे : 356824 येथे 244 = 6 म्हणजे निःशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी दोन शून्ये असतात त्या संपूर्ण संख्येस 4 ने निःशेष भाग जातो. जसे – 1345700

5 ची कसोटी :

ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो, त्या संपूर्ण संख्येस 5 ने भाग जातो. 23405, 52340.

6 ची कसोटी:

ज्या समसंख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस 3 ने निःशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येस 6 ने निःशेष भाग जातो.

7 ची कसोटी :

संख्येच्या एककस्थानी असलेल्या अंकांची दुप्पट

करून ती दुप्पट राहिलेल्या संख्येतून (एकक स्थान वगळून) वजा करा. हीच क्रिया पुन्हा पुन्हा करा. दोन अंकी संख्या तयार होईपर्यंत हीच कृती करा. यास जर 7 ने निःशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस 7 ने निःशेष भाग जातो. जसे

8 ची कसोटी :

ज्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक स्थानांच्या अंकांनी तयार झालेल्या संख्येस जर 8 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निःशेष भाग जातो. जसे : 1357408, 8267284 इत्यादी.

9 ची कसोटी :

ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस 9 ने निःशेष भाग जातो, त्या संपूर्ण संख्येस 9 ने निःशेष भाग जातोच. 54279, 123453 इत्यादी.

10 ची कसोटी:

ज्या संख्येच्या एककस्थानी ० असेल, त्या संख्येस 10 ने निःशेष भाग जातोच. 1090, 2100, 8570 इत्यादी.

11 ची कसोटी:

ज्या संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज

आणि विषम स्थानांच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11 च्या पटील असल्यास, त्या संपूर्ण संख्येस 11 ने निःशेष भाग जातो. जसे 542795, 8192756

12 ची कसोटी: येथे 12 = 2 × 2 × 3 किंवा 4 × 3 अवयव येतात.

4 × 3 यावरून ज्या संख्येतील एकक आणि दशक स्थानांच्या अंकांमुळे तयार झालेल्या संख्येस 4 ने निःशेष भाग जातो आणि त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेस 3 ने निःशेष भाग जातो अशा संख्येस (समसंख्या) 12 ने निःशेष भाग जातोच.