प्रदत्त मत म्हणजे काय? Tender Votes
एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आणि त्या व्यक्तीऐवजी दुसरीच व्यक्ती तिच्या नावे आधीच मतदान करुन गेली आहे असे निदर्शनास आले तर मतदान केंद्राध्यक्ष यांनी नंतर आलेल्या व्यक्तीस काही प्रश्न विचारुन तीच खरी मतदार असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. नंतर आलेली व्यक्ती हीच खरी मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या व्यक्तीस प्रदत्त मतपत्रिका देऊन प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करुन घ्यावे. मात्र कुठल्याही परिस्थितीत अशा मतदारास मतदान यंत्रावर (EVM) मतदान करता येणार नाही.
प्रदत्त मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर २० मतपत्रिका दिल्या जातील.
मतदान केंद्राध्यक्षाने ‘नमुना 17 C’ मधील भाग-1 मधील अ.क्र.9 मध्ये यासंदर्भातील आकडेवारी नमूद करावी.
127
128
प्रदत्त मते (Tender Votes)
तसेच मतदान केंद्राध्यक्षाने ‘नमुना 17 B’ मध्ये प्रदत्त मतदानाची माहिती नमूद करावी. यावरील रकाना क्र.५ मध्ये अशा मतदाराची स्वाक्षरी अथवा अंगठा घेण्यात यावा व तदुनंतर प्रदत्त मतपत्रिका देण्यात यावी. तसेच मतपत्रिकेसोबत शाई लावलेला बाण फुलीचा रबरी स्टॅम्प द्यावा. या बाण फुलीच्या स्टॅम्पने सदर मतदार मतदान करील.
अशा प्रदत्त मतपत्रिका त्यासाठी दिलेल्या स्वतंत्र लिफाफ्यामध्ये सीलबंद करुन साहित्यासोबत जमा कराव्यात.
या मतपत्रिकेच्या मागील बाजूने तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षराने “प्रदत्त मतपत्रिका” असे स्पष्ट लिहायला हवे.