शिक्षकांनी शिकवायचे कधी ?अभियान,उत्सव अन् फोटो अपलोडमध्ये गुंतले शिक्षक teaching and learning
सकाळ वृत्तसेवा बिजोरसे, ता. ९ : शासनाने कोणतेही अभियान किंवा उत्सव सुरू करावा आणि त्याची पहिली जबाबदारी शिक्षकावर द्यावी, अशी स्थिती राज्यात झाली आहे. शाळांमध्ये दोन अभियान आणि एक उत्सव सुरू आहे. ऑगस्टअखेर शिकविण्यापेक्षा यातील उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यातच शिक्षकांचा वेळ खर्ची पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहितेपर्यंत हे असेच चालणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकवावे कधी? हा शिक्षकांचा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाचा दुसरा टप्पा २९ जुलैपासून सुरू होऊन तो ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ५ सप्टेंबरपासून या स्पर्धेसाठीचे मूल्यांकन होणार असून, यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य
पातळीवर बक्षीस ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासन धावपळीत आहे अशातच नेहमीच्या उपक्रमापेक्षा वेगळे उपक्रम राबवायचे असल्याने शिक्षक आता याच कामात गुंतले आहेत. यावेळी १ ते एक ३१ ऑगस्ट या कालावधी विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियान राबवण्यास सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या २० दिवसात अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्यायच्या आहेत त्यानंतर सहा
Nashik, District-Today 10/08/2024 Page No. 4
शिक्षकांची कामे
■ २९ जुलै ते ४ सप्टेंबर माझी सुंदर शाळा
■ ५ सप्टेंबरपासून स्पर्धेसाठीचे मूल्यांकन
■ १ ते ३१ ऑगस्ट विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान
■ ३० ऑगस्टपर्यंत महावाचन उत्सव चालणार
सप्टेंबरला विधानसभेची 66 आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच सर्व उपक्रम संपविण्याची घाई सुरू आहे. विद्यार्थी शाळेत दाखल झाल्याने त्यांना शिकवण्याची वेळेतच विविध अभियान, उत्सव करणे आणि त्याचे फोटो अपलोड करण्यातच शिक्षकांचा वेळ जात आहे.
दिवसात या शाळेतील त्रुटी दूर करून सुधारणा करून घ्यावयाच्या आहेत त्यानंतरच्या चार दिवसात या सुधारणा झाल्याची त्रुटी दूर झाल्याची खात्री करून घ्यायची आहे.
प्रफुल्ल निकम, मुख्याध्यापक
वाचन उत्सव
सर्व शाळांमध्ये २२ जुलैपासून “महावाचन उत्सव” सुरू झाला आहे. हा उत्सव ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे या काळात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण
करण्यासाठी दर्जेदार साहित्यिक आणि लेखक यांची भेट होऊन त्यांचा परिचय करून देण्यासाठीचे उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आहेत साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार यांना साहित्य विषयक उपक्रमासाठीच्या निमंत्रणाच्या आणि नियोजनाच्या गडबडीत आहेत.