निधीच्या कमतरतेमुळे शिक्षकांच्या पगारी रखडल्या: शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संताप teachers’ payment budget
पूर्णा : शासनाकडून शिक्षकांच्या पगारीसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतनरखडले आहे. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.
राज्यातील शिक्षक,
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी शासनाकडून पगारी हेडला निधीची तरतूद करण्यास विलंब होत आहे. परिणामी शिक्षकांचे वेतन रखडले आहे. शासन स्तरावर शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी वरिष्ठ स्तरावर निधी उपलब्ध व्हावा यासाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहेत. पण शासनाच्या
तिजोरीत पुरेशा निधी उपलब्ध नसल्यामुळेच शिक्षकांच्या वेतनासाठी आर्थिक तरतुद होत नाही असे पुणे स्तरावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटी वर सांगितले
परभणी जिल्ह्यात एकुण संख्या ७ हजार ८०० एवढी शिक्षक संख्या आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक शाळाची संख्या ६२३ एवढी आहे. त्यातील शिक्षक संख्या ५७८७ एवढी आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या एकुण ८९० एवढी आहे. अंशतः अनुदानित उच्च
माध्यमिक शाळा १३० आहेत. अंशतःअनुदानित कनिष्ठ महाविद्याल च्या शिक्षकांसाठी दर महिना ०५११ या हेड ला परभणी जिल्ह्यातील शिक्षकांना
एकुण पगारा पोटी जवळपास अडीच कोटी लागतात. पण शासनाकडून नॉनप्लान अनुदान केवळ ८० ते ७० लाखच हेडला टाकला जातो. शासनाकडून अंशतःअनुदानित कनिष्ठ
महाविद्यालयीन शिक्षकांवर अन्याय करत आले आहे. याबाबतशिक्षक समन्वयक संघ व मराठवाडा शिक्षक संघ यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अन्यथा आंदोलन छेडणार
लाडक्या बहिण योजनेंतर्गत महिलांना डिसेंबरचा हप्ता शासनाकडून दिला. मात्र शिक्षकांच्या वेतनासाठी मात्र तिजोरीत पैसा नाही. शासनाकडून शिक्षकांनवर अन्याय नव्हे काय? या आठवडयात वेतन दिले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करु रवीकांत जोजारे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य. समन्वयक
वेतन वेळेवर होणे आवश्यक
शिक्षकांचे वेतन वेळेवर न झाल्या मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, शिक्षकांनी गृह कर्ज व इतर कर्ज घेतलेले असतात त्यांचे चेक वेळेवर न गेल्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो, विमा भरण्याच्या तारखेला विमा भरता येत नाही, टप्पा अनुदानित शिक्षकांना तर आपला घरखर्च ही चालविणे अवघड होते त्या मुळे शिक्षकांचे आणि सर्व कर्मचा- यांचे वेतन वेळेत होणे गरजेचे आहे. यशवंत मकरंद. जिल्हाध्यक्ष. मराठवाडा शिक्षक संघ परभणी