नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होईल शिक्षक बदली प्रक्रिया, प्रशासकीय संभाव्य नियोजनाला झाली सुरुवात teachers online transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होईल शिक्षक बदली प्रक्रिया, प्रशासकीय संभाव्य नियोजनाला झाली सुरुवात teachers online transfer

जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या

जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक शासनाने नुकतेच जाहीर केले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बदली प्रक्रिया सुरू होत आहे. एक जानेवारी ते ३१ मेपर्यंत विविध टप्प्यात ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी शासनाने धोरण निश्चित केले असून यानुसार ही प्रक्रिया होत आहे.

सदर प्रक्रिया शासनाने निश्चित केलेल्या धोरणांच्या अनुषंगाने ऑनलाइन पोर्टलद्वारा राबविली जाणार आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिले आहेत. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करत शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाइन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध

करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना या आदेशात शासनाने दिल्या आहेत.

शिक्षा परि

बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल तयार करणे, अद्यावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे ही कार्यवाही २८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करावी. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाइल मध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही असे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान सदर प्रक्रियेत एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याच्या सूचना देखील या आदेशात देण्यात आल्या आहेत.

शिक्षक बदली वेळापत्रक असे :

👉बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्धी व आक्षेपांवर निर्णय : १ जानेवारी पासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत

👉समानीकरणांतर्गत व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती निश्चित करणे : १ मार्च ते ३१ मार्च

👉बदलीसाठी आवश्यक डाटा तयार करत उपलब्ध करणे: १ एप्रिल ते २० एप्रिल

👉समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे: २१ एप्रिल ते २७ एप्रिल

👉विशेष संवर्ग शिक्षक भाग एक रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे: २८ एप्रिल ते ३ मे

👉 विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे व बदल्या करणे: ४ मे ते १५ मे

👉 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे : १० ते १५ मे

👉बदलीपात्र शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे : १६ ते २१ मे

👉विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, पसंतीक्रम भरणे, बदल्या करणे: २२ ते २७ मे

👉अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे: २८ ते ३१ मे