कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्यास शिक्षकांना परवानगी देणेबाबत teachers’ karyashala prashikshan
संदर्भ- १. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी. एन. एच. एस.) यांचे पत्र क्र. १३६/२०२५ दि. २२/०१/२०२५
२. मा. आयुक्त (शिक्षण) म.रा पुणे यांचे पत्र क शिजका २०२४२५ आस्था क माध्य ३८२, दि २३.०१.२०२५
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रे पहावीत. (प्रत संलग्न) संदर्भ क्र १ अनुसार बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र शासनाची चंद्रपूर वन अकादमी यामध्ये एक सामंजस्य करार झाला असून या द्वारे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. सदर करारा नुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या व पर्यावरण विषयात रुची असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांसाठी “पर्यावरण शिक्षण” या विषयावर एका शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चंद्रपूर अकादमी मध्ये दि. २७ ते दि.३१ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक जनजागृती करण्याच्या उद्देशाने शाळांसोबतच पर्यावरण प्रेमी शिक्षकांना पर्यावरण संवर्धनाचे व पर्यावरण शिक्षणाचे अद्यावत ज्ञान देण्यासाठी सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये पर्यावरण शिक्षणाचे महत्व, पर्यावरणीय शिक्षणाचा इतिहास आणि उत्क्रांती, प्रभावी पर्यावरणीय शिक्षणाची तत्त्वे, स्पष्ट शिक्षण उद्दिष्टे विकसित करणे, आकर्षक धडे योजना आणि उपक्रम तयार करणे, विविध वयोगटांसाठी शैक्षणिक सामग्रीचे रुपांतर करणे, प्रभावी कथाकथन आणि दृश्य संवाद, प्रात्यक्षिके, सामदायिक संस्थां, सोशल मीडिया आणि मोबाईल अॅप्स, दीर्घकालीन धोरणे विकसित करणे शिवाय तज्ञांचे मार्गदर्शन तसेच ताडोबा येथे वन्य जीव दर्शन पण अंतर्भूत असेल. सदर प्रशिक्षण, निवास व भोजन निःशुल्क आहे.
संदर्भ क्र २ पत्रातील निर्देशानुसार यादीमधील शिक्षकांना सदर शिबिरास उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करुन शिबिरास उपस्थित राहणेबाबत सूचना आपले स्तरावरुन दयाव्यात.