शिक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या teachers’ duty and responsibility 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या teachers’ duty and responsibility 

१. विहित केलेल्या कार्यभाराप्रमाणे आणि शालेय शिक्षणाला पोषण/पूरक अशा कार्यक्रमाबाबतचे सोपविलेले अध्यापनाचे काम करील.

२. शाळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहील. वार्षिक नियोजनानुसार व घटक नियोजनानुसार अध्यापनाचे काम विहित वेळेत पूर्ण करील. महिन्याच्या अखेरीस पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाच्या अद्ययावत नोंद ठेवील.

३. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करील.

४. वेळापत्रकात दिलेल्या विषयांचे नियोजन करील आणि त्यावरून साप्ताहिक व दैनंदिन घटक नियोजन करील. वेळापत्रक मिळाल्यापासून एक आठवड्यात याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकाकडे सादर करील.

५. कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या यादीनुसार खात्री केल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या नोंदी हजेरी पुस्तकात घेईल. नेमून दिलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती हजेरी पुस्तकात नोंदवील. या नोंदी मुख्याध्यापकांकडून महिना अखेरीस साक्षांकित करून घेईल.

६. वर्गात वेळेवर उपस्थित राहील व विद्यार्थीही दररोज वेळेवर उपस्थित राहतील याची काळजी घेईल.

७. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याचा आटोकाट प्रयत्न करील.

८. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत व गळतीबाबत जागरूक राहून गळती थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

९. वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करील.

१०. ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती अपेक्षेपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता विशेष उपाययोजना करील,

११. शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून मुलांना शाळेत उपस्थित ठेवण्यासाठी प्रवृत्त करील.

१२. विषयज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथाचा उपयोग करील.

१३. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व सुयोग्य अध्यापन पद्धतीचा उपयोग प्रभावीपणे करील.

१४. वर्गातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी प्रयत्न करील व विद्यार्थ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवील.

१५. आपल्या वागण्या बोलण्यातून आदर निर्माण करील व विद्यार्थ्यांना शिस्तीने वागण्यास भाग पाडील.

१६. विद्यार्थ्यांमध्ये जातीय सलोका व स‌द्भावना वाढीस लावील. कोणत्याही विद्यार्थ्यांवर त्याचा धर्म, जात, समाज यांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची खबरदारी घेईल.

१७. मुख्याध्यापकांनी निदेश दिल्यास आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची विहित फी

वसूल करील व सदर रक्कम कार्यालयात जमा करील.

१८. शालेय आचारसंहितेचे पालन करील.

१९. आपले सहकारी किंवा विद्यार्थी व त्यांचे पालक यांचेशी सौदार्हाचे संबंध

ठेवील व त्यांचेशी सौजन्याने वागेल.

२०. वार्षिक नियोजनानुसार आपला अध्यापन कार्यक्रम तयार करील या कार्यक्रमानुसार व नियोजनाप्रमाणे अध्यापनाचे काम करील. प्रतिदिनी रोजवहीत

संक्षिप्तपणे नोंदी ठेवील खाली दर्शविल्याप्रमाणे या नोंदी ठेवील.

अ) तारीख, वर्ग, विषय

ब) अध्यापनाच्या कालावधीमध्ये शिकवावयाचा घटक.

(पूर्ण करावयाचा अभ्यासक्रम)

शाळा व्यवस्थापन मार्गदर्शक ३३

क) अभ्यास विषयाच्या स्वरुपावर अवलंबून वाकप्रयोग, वाकप्रचार, कल्पना तत्त्वे, सुत्रे, घटना इत्यादींचा अध्यापनाचा केलेला वापर.

ड) अध्यापनाची साधन किंवा प्रयोग निदर्शन इत्यादी.

इ) लिखाणाचे काम, पठण, ठळक वाचन यासारखे गृहपाठाचे स्वरूप २१. विशेषतः भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित, वाङमय इत्यादीसारख्ख विषयामधील घटक सादर करताना शाळेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून अध्यापन प्रभावी करण्याचा प्रयत्न करील विद्यार्थ्यांकडून सर्व प्रात्यक्षिकांचे काम करून घेईल.

२२. कामाच्या आखलेल्या प्रत्यक्ष आराखड्याप्रमाणे काम करील आणि त्यात कोणत्याही त्रुटी राहिल्या तर प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संबंधित वर्गाच्या मासिक नोंदवहीत त्याबाबतची कारणे नमूद करील आणि मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांच्याशी विचारविनिमय करून, असलेल्या त्रुटी किंवा उणीवा दूर करण्यासाठी उपाय योजील.

२३. विद्यार्थ्यांना आठवड्याचा अभ्यास नेमून देईल त्यामुळे संपूर्ण वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयातील किमान ३० नवीन अभ्यासकामे पूर्ण करणे शक्य होईल.

२४. विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या आठवड्याच्या गृहपाठाची चिकित्सकपणे तपासणी करील व त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना सूचना व मार्गदर्शन करील.

२५. प्रत्येक सत्रामध्ये प्रश्नपत्रिका तयार करून एक वस्तुनिष्ठ पद्धतीची चाचणी घेईल आणि पंधरवड्याच्या आत तपासणी केलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना परत करील.

२६. मुख्याध्यापकाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे त्याच्या विषयाच्या सहामाही आणि इतर चाचणी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका काढील आणि उत्तरपत्रिकांची तपासणी करील व निकाल तयार करील.

२७. शैक्षणिक सहली व अन्य शालेय कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थी बाहेरगावी असताना सोपविलेल्या जबाबदारीनुसार स्वतः शिस्त पाळील व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त पाळली जाईल असे पाहील. त्याचप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेबाबतची सर्व प्रकारची दक्षता घेईल.

शिक्षकांच्या जबाबदाऱ्या :-

१. त्याच्या वर्गातील किंवा तो शिकवित असलेल्या विषयाच्या संदर्भात किमान शैक्षणिक दर्जा टिकविण्यासाठी तो जबाबदार राहील.

२. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या संदर्भात (सामुहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या) तो व्यवस्थापनास पालक-शिक्षक संघास आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागास उत्तरदायी राहील.

३. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेल्या परीक्षा व अन्य शासकीय परीक्षा किंवा शासनाकडून शिफारस केलेल्या संस्थाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे काम करील व या परीक्षांच्या कामाची गोपनीयता राखील.

४. मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक वेळोवेळी सोपवतील ती कामे पार पाडील.