सन २०२५ ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया विहीत वेळापत्रकानुसार पूर्ण करणेबाबत teacher transfer portal update
संदर्भ: शासन सम क्रमांक दि.०७.११.२०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन समक्रमांक दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करणेत आले आहे. सदर वेळापत्रक मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी अवमान याचिका क्र.२१६/२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी या विषयाबाबत दि.०४.०४.२०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार विहीत वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची आपणांस विनंती आहे.