अमरावती जिल्हा परिषद शिक्षकांच्या विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ व भाग-२ यांचे बदल्यांबायत teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती जिल्हा परिषद शिक्षकांच्या विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ व भाग-२ यांचे बदल्यांबायत teacher transfer 

संदर्भ :

– १) महाराष्ट्र शासन ग्रा.वि.वि. शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४ दिनांक ७/४/२०२१

२) महाराष्ट्र शासन ग्रा.वि.वि.यांचे पत्र क्र. न्यायप्र-२०२४ प्र.क्र.१०५/आस्था-१४ दिनांक ३१/५/२०२४

३) दिनांक ४/६/२०२४ रोजी शिक्षणाधिकारी यांनी सभेत दिलेल्या सूचना

४) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दिनांक १८ जुन २०२४

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय-२ अन्वये अमरावती जिल्हा करिता शासनाने ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविणेस्तव पोर्टल सुरू करण्याबाबत परवानगी प्रदान केलेली आहे. त्यानुसार संदर्भिय १ चा शासन निर्णय अधिक्रमित करून जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या संदर्भिय-४ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

संदर्भिय ४ च्या शासन निर्णयातील मुद्या क्र.१.८ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मध्ये १.८.१ ते १.८.२० गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याच प्रमाणपत्र अर्जा सोबत सादर करणे अनिवार्य आहे सदर अर्जाच्या पात्रतेबाबत ४.२.८ नुसार गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे तालुकास्तरीय समितीने शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे वा आजाराचे प्रमाणपत्र तालुकास्तरावर काटेकोरपणे पडताळणी करून दिव्यांग (UDID) प्रमाणपत्र आजाराचे प्रमाणपत्र योग्य अयोग्य असल्याबाबत खात्री करून घ्यावी.

संदर्भिय ४ मधील शासन निर्णयातील मुद्या क्र. ४.३ विशेष संवर्ग भाग २ मधील ४.३.४ पती पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमुद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. शिक्षकांनी ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सक्षम प्राधिकाऱ्या कडून प्राप्त करून घेवून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास संवर्ग-२ अर्ज संबंधित शिक्षकांनी सादर करावा व पं.स. कार्यालयास पडताळणी करावी.

सदर प्रकरणी आजाराचे /दिव्यागत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याबाबत मागच्या बदलीमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांना वैद्यकिय मंडळ यवतमाळ येथे आजाराची तपासणी करणेस्तव पाठविण्यात आले आहे या यावत सर्व शिक्षकांना जाणीव करून देण्यात यावी. सदर घटनेची पुर्नवृत्ती होणार नाही याची तालुकास्तरीय समितीने गंभीर दखल घ्यावी.

प्रमाणपत्रांची पडताळणी करतांना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी माहिती व दिशाभूल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास शासन निर्णयातील मुद्या क्र.५.१०.५ नुसार संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्यांचे विरूध्द शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या कारवाईस शिक्षक स्वतः जबाबदार राहतोल व त्यांनतर त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकुण घेतले जाणार नाही याची सर्व शिक्षकांनी आपले स्तरावरून जाणीव करून देण्यात यावी.

 

Leave a Comment