शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाचत teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाचत teacher transfer 

संदर्भ – १) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक झिप ४८२०/पी.क्र. २९०/आस्था-१४ दि.७/४/२०२१

२) शालेय शिक्षण व कीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र. 174/ टीएनटी-1 दि.21/06/2023

3) पवित्र प्रणाली‌द्वारे अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-2022 आधारे जि.प. लातूर निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची गुणवता यादी दिनांक 25/02/2024,

४) आपले पत्र क्र. संकीर्ण-2024/प्र.क्र 45/आस्था-14 दिनांक 11/03/2024

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रान्वये आपण शिक्षक अभियोग्यता व दुध्दीमता चाचणी परिक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क. (02) च्या शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे कळविलेले आहे.

संदर्भ क. (03) अन्वये पवित्र प्रणालीद्वारे अभियोग्यता व बुध्दिमता चाचणी-2022 आधारे जि.प. लातूर आस्थापना निवडीसाठी शिफारस झालेल्या मराठी माध्यम-५५ उमेदवारांची गुणवत्ता यादी उपलब्ध करन दिलेली आहे. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे याचे पत्र दि.25/2/2024 व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय दि.23/6/2017 मधील तरतुदीनुसार सबंधित उमेदवाराच्या कागदपाची पडताळणी करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना समुपदेशना‌द्वारे नियुक्ती देणे बाबतची कार्यपध्दती सदर्भ क. (02) च्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेली आहे.

त्यानुसार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना समुपदेशना‌द्वारे दि.11/03/2024 रोजी नियुक्ती आदेश देण्यात आलेले असून तद नंतर संदर्भ क. 4 चे पत्र प्राप्त झालेले आहे. या कार्यालयाकडून समुपदेशनाद्वारे संबंधीत उमेदवारास पदस्थापना दिल्यानतर संदर्भ क्र. ४ मध्ये नमुद केल्यानुसार ऑफलाईन पदस्थापना द्यावी किंवा कसे.

तसेच संदर्भ क्र. (02) च्या शासन निर्णयातील मुद्दा क. (02) मध्ये जिल्हा अंतर्गत बद‌लीसाठी जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्याच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनादवारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात याची. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता प्यावी, अशी नालूट आहे.

तथापी सदर्भ क्र. (01) च्या शासन निर्णयातील मुद्यां क्र.5.1 मध्ये शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ओनलाईन पध्दतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे, अशी तरतूद असून सदरील शासन निर्णय अधिक्रमील करण्यात आलेला नाही तसेच संदर्भ क. (02) च्या शासन निर्णयामध्ये बदली इच्छुक शिक्षकांना समुपदेशाने त्याच्या विकल्पानुसार संधी देलाना कार्यपध्दती कशी असावी याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे जि.प. स्तरावर ऑफलाईन पध्दतीने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना संदिग्धता निर्माण झालेली आहे. करिता शासन निर्णय दि.21 जून. 2023 मधील तरतूदीनुसार जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पूर्वीपासून कार्यरत बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या पिकल्यानुसार एक संधी देवून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविताना कार्यपध्दती कशी असावी तसेच संदर्भ क. (01) च्या शासन निर्णयामध्ये शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याची तरतूद असल्याने जि.प. स्तरावर ओफलाईन पध्दतीने शिक्षकांच्या बदल्या करता येतील किया कसे? याबाचल कृपया मार्गदर्शन व्हावे.

teacher transfer 
teacher transfer

Leave a Comment