जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या सुरू teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या सुरू teacher request transfer 

संदर्भ :- १. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र. २९०/आस्था-१४ दिनांक ७ एप्रिल २०२१

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्रं. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७४/ टिएनटी-१ दिनांक २१/६/२०२३

३. उपसचिव ग्रामविकास विकास विभाग मुंबई यांचेकडील पत्र क्रं. संकिर्ण- २०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४ दिनांक ११/३/२०२४

उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरुन, संदर्भ क्रं. १ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्याबाबत शासनाने सुधारीत धोरण निश्चित केले आहे. संदर्भ क्रं. २ च्या शासन निर्णयान्वये जिल्हातंर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नविन पदे विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी, असे नमूद आहे. तसेच संदर्भ क्रं. ३ च्या पत्रानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रं. २ मधील शासन निर्णयनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे.

ग्रामविकास विभागाकडील दिनांक ७/४/२०२१ च्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या सुचनेनुसार, आपले अधिनस्त कार्यरत शिक्षकापैकी विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२, सर्वसाधारण संवर्ग मधून बदली इच्छूक शिक्षकामंधून विनंती बदली मागणी करणा-या शिक्षकांची माहिती यासोबत जोडणेत असलेल्या प्रपत्रामध्ये सादर करणेची आहे. सदर माहिती सादर करित असताना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग – १, विशेष संवर्ग-२ व सर्वसाधारण संवर्गामधील शिक्षकांची माहिती स्वतंत्र प्रपत्रात सादर करणेत यावी. तसेच विशेष संवर्ग -१ व विशेष संवर्ग-२ मध्ये समाविष्ट असणा-या शिक्षकांची माहीती पुराव्याच्या कागदपत्रासह सादर करणेची आहे.

प्रस्तावित प्रकियेमध्ये विहीत मुदतीमध्ये अर्ज सादर न करणा-या शिक्षकांचा बदली प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही व सदर बाबत कोणतीही हरकत / तक्रार स्विकारली जाणार नाही.

Teacher request transfer
Teacher request transfer

तसेच, सदर बदली प्रक्रिया ही शासन स्तरावरुन प्राप्त होणा-या मार्गदर्शनाचे आधारे पूर्ण केली जाईल ही वाव आपले अधिनस्त सर्व कर्मचा-यांचा निदर्शनास आणून देवून त्याची पोहोच दप्तरी दाखल करुन ठेवावी. तसे प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे. तसेच कोणत्याही शिक्षकाने परस्पर बदलीबाबत या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करु नये, ही बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणणेत यावी. परस्पर शिक्षकाने

 

1 thought on “जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या सुरू teacher request transfer ”

Leave a Comment