सीईओ आव्हाळेंकडून शिक्षण विभागाला शाबासकी शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शक पार पाडल्याबद्दल केले कौतुक teacher request transfer
सोलापूर, ता. २१: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ९०० हून अधिक प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली. ही बदली प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षण विभागाला शाबासकी दिली. त्यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह या प्रक्रियेतील त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन पत्र देऊन कामकाजाचे कौतक केले.
१० ते २१ जून या कालावधीत येथील नेहरू वसतिगृहात बदलीची प्रक्रिया पार पडली. यात ८६२ विनंती बदल्या, ४० न्यायालयीन आदेश, ५४ आंतरजिल्हा, १० समायोजन अशा १०० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
यात तालुकांतर्गत बदल्यांचाही समावेश
होता. मुख्य कार्यकारी अधिकारी
आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षण व
आरोग्य या ग्रामीण जनतेशी निगडित
असलेल्या दोन विभागांवर लक्ष केंद्रित
केले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीवर विशेष लक्ष होते. प्राथमिक शिक्षण विभाग त्यात यशस्वी ठरली असून शिक्षक संघटनेनेही त्याच्या कामाचे कौतुक केले आहे.
कुटुंब प्रमुखांकडून शाबासकी ऊर्जा देणारी
■ मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला अभिनंदन पत्र देऊन बदली प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल कौतुक केले आहे. हे अभिनंदन केवळ माझे नसून संपूर्ण शिक्षण विभागाचे आहे. त्यांच्या सूचनेनुसार शैक्षणिक गुणवत्ता वाढीतही आपण चांगली कामगिरी करू, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केला.