जिल्हा परिषदअंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer
संदर्भ :-1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः जिपब-4820/ प्र.क्र.290/आस्था-14 दि. 18/06/2024
2) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्र. संकिर्ण-2023/174/टीएनटी-1दि.21/06/2023
3) मा.उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण-2023/प्र.क्र.174 /टीएनटी- 1दि.21/06/2023
4) मा.उप सचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण-2024/प्र.क्र.45/आस्था-14 दि. 11/03/2024
5) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गट शिक्षणाधिकारी व जिल्हातील मान्यताप्राप्त शिक्षक
संघटना यांचे प्रमुख/प्रतिनिधी यांची सहविचारसभा दि. 14/03/2024 रोजी
6) या कार्यालयाचे पत्र क्र.3084, दि.30/04/2024
7) या कार्यालयाचे पत्र क्र.3784, दि. 12/06/2024
8) या कार्यालयाचे पत्र क्र.4211, दि.01/07/2024
9) या कार्यालयाचे पत्र क्र.4276, दि.04/07/2024
10) या कार्यालयाचे पत्र क्र.4304, दि.05/07/2024
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क्र.02 मधील मुद्या क्र.02 नुसार
जिल्हातंर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पा नुसार
एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश आहेत. संदर्भ क्रमांक. 03 व 04 नुसार संदर्भ क्रमांक 02 च्या शासन निर्णयनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. तसेच संदर्भ क्र. 5 अन्वये लोकसभा निवडणूक 2024 बाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त संदर्भिये आदेशानुसार कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने जिल्हयातील सर्व 15 गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे विहीत नमुन्यातील विनंती बदलीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भ क्र.1 व 6 नुसार विनंती बदली साठी पात्र ठरलेल्या बदली पात्र शिक्षकांची अंतरिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.6 नुसार दिनांक 14/06/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र.७ नुसार दि.01/07/2024 रोजी दिनांक 30/06/2024 रोजीची तालुका निहाय/पदनिहाय / माध्यम निहाय रिक्त पदांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संदर्भ क्र.१० अन्वये दि.०५/०७/२०२४ रोजी तालुका निहाय/पदनिहाय / माध्यम निहाय रिक्त पदे सुधारित अंतिम
D:\Amit\2024\05-07-2024 विनंती. बदली अंतिम यादी प्रसिद्ध करणे बाबत.docx
समतोल तक्ता व रिक्त पदांची उपशिक्षक व पदवीधर या पदांच्या सुधारित याद्या व प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर रिक्त पदे व सदर अंतरिम यादी यांचा अभ्यास करुन आपल्या संवर्गनिहाय पात्रतेनुसार व सेवाज्येष्ठतेनुसार अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी जर एखादया शिक्षकांस अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास अथवा यापूर्वी दिलेला नकार मागे घ्यावयाचा असल्यास अशा शिक्षकांना आपला विनंती अर्ज सादर करण्यासाठी दि. 08/07/2024 रोजी दुपारी 02.00 वाजेपर्यंत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
प्राप्त नकार विनंती अर्ज व प्राप्त हरकती व आक्षेप यांची यांची पडताळणी करुन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी दि.०९/०७/२०२४ रोजी आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल जिल्हा कार्यालयात सादर केले आहेत. प्राप्त अहवालची तपासणी करुन बदली पात्र शिक्षकांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अंतिम यादीत पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.१ मध्ये नमूद तरतूदी नुसार दि.१८/०७/२०२४ रोजी समुपदेशन पद्धतीने संवर्गनिहाय टप्प्या टप्याने पूर्ण करण्यात येईल. सोबत जोडलेल्या अंतिम यादीतील विनंती बदलीपात्र शिक्षकांना दि१८/००७/२०२४ रोजी स.१०.०० वा समुपदेशन प्रक्रियेला उपस्थित राहणेबाबत सूचित करावे. अंतिम यादीतील शिक्षक समुपदेशनासाठी उपस्थित न राहील्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये संबधित शिक्षकांना रिक्त पदावर पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात येईल याबाबत अवगत करावे. सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी समुदेशन प्रक्रियेसाठी दि.१८/०७/२०२४ रोजी स.९.००वा सर्व माहितीसह जिल्हा कार्यालयात उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.