शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न निकाली लागल्याने:आ. नारायण कुचे यांचा सत्कार teacher request transfer
जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल बदनापूर- अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांचे आभार व्यक्त करून विविध शिक्षक संघटनांच्या वतीने रविवारी त्यांचा बदनापूर येथे सत्कार करण्यात आला.
मागील काही दिवसापासून जालना जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या दोन हजार शिक्षकांचा विनंती बदलीचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक वेळा विविध संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे विनंती बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामविकास विभागाचे आदेश असतानाही शासन निर्णय स्पष्ट नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बदली प्रक्रिया राबविण्यास नकार दिला होता.
त्यामुळे शिक्षक संघटनांनी शेवटी ग्रामविकास मंत्रालयात धाव घेतली सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने बदनापूर मतदारसंघाचे आ.नारायण कुचे यांनी शिक्षकांसह सभागृहात प्रश्नोत्तराचा शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी ईश्वर गाडेकर, मुकुंद खरात, मंगेश जैवाळ, रवींद्र काकडे, संतोष डोंगरकोस, मुकेश शिंपले, देवेंद्र बारगाजे यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..