जिल्ह्यातील ६२६ शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या बोट लावीन तेथे बदली : नाराजीचा सूर क्वचितच teacher request transfer
लोकमत न्यूज नेटवर्क: दरवर्षी अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येते. परंतु, ५ व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केलेल्या ६२६ शिक्षकांच्या बदल्यांत शिक्षक बोट ठेवतील त्याच ठिकाणी त्यांना बदली देण्यात आली. यंदाच्या बदल्यांमुळे ९० टक्के शिक्षक आनंदित, तर १० टक्के शिक्षक नाराजीत दिसले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५ व ६ जुलै रोजी बदली प्रक्रिया राबविली. यात ६२६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांत बदलीची अट असताना तिरोडा तालुक्यातील दोन शिक्षकांनी एकच वर्ष काम केले असतानाही त्यांची बदली अर्जुनी-मोरगाव तालुक्यात करण्यात आली आहे.
विज्ञान विषय शिक्षकांच्या बदली समुपदेशन कार्यशाळेत बोगस प्रमाणपत्र जोडून कुणी बदली तर करून घेतली नाही ना, याचा शोध शिक्षण विभागाने घेणे अपेक्षित आहे. बदलीच्या यादीत पात्र असलेले शिक्षक कार्यशाळेत कसे अपात्र झाले, याची एकच चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात होती.
आक्षेप पुराव्यासह नोंदविण्याचे केले होते आवाहन
६ जुलै रोजी सहायक शिक्षकांची बदली कार्यशाळा आयोजित करण्यात
आली होती. त्या कार्यशाळेची सेवाज्येष्ठता यादी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती. त्या यादीवर कुणाचे आक्षेप असल्यास पुराव्यासह सकाळी ८:३० वाजता स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात भेटा. त्याचप्रमाणे यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास अशाही उमेद- वारांनी कळविण्याचे आवाहनही एक दिवसाअगोदरच करण्यात आले होते.
संवर्ग एक आणि दोनमध्ये जे शिक्षक असतील आणि त्यांनी त्या
संवर्गाचा लाभ घेतला नसेल तर त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यांना तीन वर्षांची अट लागू नाही. परंतु, संवर्ग चार असेल तर त्याला पाच वर्षाची अट आहे. बदली अत्यंत पारदर्शकतेने करण्यात येत आहे. कुणाला आक्षेप असल्यास आम्ही आक्षेपदेखील मागविले आहेत.
– सुधीर महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प., गोंदिया.