जि.प.अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत. (दुसरा टप्पा) शिक्षकांचे विनंती अर्ज सादर करणेयबाबत teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत. (दुसरा टप्पा) शिक्षकांचे विनंती अर्ज सादर करणेयबाबत teacher request transfer 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत. (दुसरा टप्पा) शिक्षकांचे विनंती अर्ज सादर करणेयबाबत.

संदर्भ

:- १) शालेय शिक्षण व कोडा विभाग शासन निर्णय क संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४ टीएनटी-१ दि. २१/०६/२०२३. २

) मा.उप सचिव शालेय शिक्षण व कोडा विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई पत्र क्र.संकीर्ण २०२३. प्र. क. १७४ टिएनटी-१ दिनांक ६३ २०२४.

३) मा.उप सचिव ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे पत्र क. संकीर्ण. २०२४.प्र.क्र.४५ आस्था-१४ दिनांक ११०३ २०२४ ४) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे समुपदेशन प्रक्रियेतील निदेश दिनांक ०५००७ २०२४.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय-१ चे शासन निर्णयान्वये जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूवोपासून कार्यरत

आहेत त्यांच्यापैको इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदो नियुक्ती

देण्याबाबत नमुद आहे. त्यानुसार संदर्भिय-२ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबतचे निदेश प्राप्त आहेत. दिनांक ०५.०७ २०२४ रोजो मेळघाट आदिवासो क्षेत्रात विनंतीवरून बदलीने जाणाऱ्या एकूण १४ बदली इच्छूक

शिक्षकांचे समुपदेशनाची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती यांचे उपरोक्त संदर्भिय-४ नुसार मेळघाट आदिवासी क्षेत्रात विनंतीवरून बदलीने जाणाऱ्या बदली इच्छूक शिक्षकांचे अर्ज (दुसरा टप्पा) तात्काळ मागविणेबाबत निदेश प्राप्त आहेत.

यास्तव आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांपैकी बदली इच्छूक शिक्षकांचे मेळघाट आदिवासी क्षेत्रात बदलीने पदस्थापना पाहिजे असल्याबाबतचे (मराठी/उर्दू माध्यम) विनंती अर्ज यापूवी पाठविण्यात आलेल्या विहित प्रपत्रात सेवाविषयक माहिती भरून दिनांक ०८/०७/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथ) कार्यालयास सादर करावेत. प्रत्यक्ष या कार्यालयात सादर केलेले अर्ज सुध्दा स्वीकारल्या जातील याबाबत संबंधित शिक्षकांना आपले स्तरावरून सूचित करावे. कोणत्याही शिक्षकांचा अर्ज आपले कार्यालयात प्रलंबित

राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

दिनांक ०८/०७/२०२४ रोजी नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत याबाबत सर्व संबंधितांना आपले स्तरावरून सूचित करण्यात यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top