जि.प.शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढणार;गिरीश महाजन(ग्रामविकासमंत्री) teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढणार;गिरीश महाजन(ग्रामविकासमंत्री) teacher request transfer

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून कोणावर ही अन्याय करणार नाही. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बदल्यांसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विधान परिषदेत चर्चेच्या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री गिरीश महाजन यांनी यावर उत्तर दिले.

ते म्हणाले की, संवर्ग एक मधील शिक्षक वर्षांनुवर्षे ज्या ठिकाणी पाठवले जाते, तेथेच काम करतात. त्यापैकी अनेकांना आपल्या गावी किंवा घराजवळ पदोन्नती हवी असते. शासनाच्या नियमानुसार संवर्ग एक मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण व्हावा लागता. इतर नियमांची पूर्तता होणे आवश्यक असते.

आताही ११ हजार शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २५०० ते २६०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु बिंदू नामावलीची अट आणि त्या श्रेणीतील संबंधित ठिकाणी रिक्त जागा नसल्याने बदली करता आलेली नाही. आताही नियमानुसार तीन वर्षे झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे बदल्या करता आल्या नसल्याची कबुली मंत्री महाजन यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top