जि.प.शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया समुपदेशनाने होणार teacher request transfer
जिल्हातंर्गत विनंती बदली प्रक्रीये बाबत.
संदर्भ:-
1. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रंमाकः जिपब-4820/प्र.क्र 290/आस्था-14 दि. 7/04/2021 2. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रंमाकः संकीर्ण-2023/174/टीएनटी-1 दि.21/06/2023
3. मा. उपसचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्रंमाक संकीर्ण-2023/प्र.क्र. 174/टीएनटी-1 दिनांक 06/03/2024
4. विविध शिक्षक संघटनेचे निवेदन
5. या कार्यालयाचे पत्र क्र. जिप/शिवि/आस्था. 3/ कावी 3012 दिनांक 25/6/2024.
6. या कार्यालयाचे पत्र क्र. जिप/शिवि/आस्था. 3/कावी 3036 दिनांक 27/6/2024
उपरोक्त विषयी व संदर्भिय क्रं.02 शासन निर्णयातील नमुद केल्याप्रमाणे जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे
शिक्षक पुर्वीपासून कर्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास रिक्त पदी नियुक्ती देण्या बाबत निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार विनंती बदली इच्छुक शिक्षकांकडून विनंती बदली अर्ज मागविण्यात येवून अंतीम जेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली होती.
अंतीम जेष्ठता यादीतील विनंती बदलीसाठी पात्र ठरलेल्या संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील उच्चश्रेणी मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदविधर या संवर्गातील ज्या शिक्षकांनी विकल्प सादर केलेले आहेत अशा बदलीपात्र उच्चश्रेणी मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदविधर शिक्षक यांनी दिनांक 3/7/2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा परिषद परभणी येथे संवर्ग 1 व संवर्ग 2 संदर्भातील मुळ कागदपत्रासह समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित रहाणे बाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांनी सूचना
दिलेल्या आहेत. त्यानुसर सर्व सबंधीतांना जिल्हातंर्गत विनंती बदलीच्या अनुषंगाने समुपदेशन प्रक्रीयेसाठी उपस्थित राहणे बाबत आपल्यास्तरावरुन सुचना देण्यात याव्यात