शिक्षक जिल्हांतर्गत विनंती बदली प्रक्रियेत विकल्प पत्र सादर करणे बाबत रिक्त पदांचा अहवाल teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक जिल्हांतर्गत विनंती बदली प्रक्रियेत विकल्प पत्र सादर करणे बाबत रिक्त पदांचा अहवाल teacher request transfer 

संदर्भ-1. शासन निर्णय ग्रामविकास क्रमांक जिपब-4820/प्र.क्र.290/आ-14 दिनांक 07.04.2021

2. शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग संकीर्ण 2023/174/टीएनटी-1/ दिनांक 21.06.2023

3. मा. उपसचिव, शालेय शिक्षण यांचे पत्र क्र. संकीर्ण 2023/प्र.क्र.174/टीएनटी-1/ दि.06.03.2024

4. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिप/शिवि/आस्था-3/2602/2024 दिनांक 29.05.2024

उपरोक्त संदर्भीय क्रमांक 2 शासन निर्णयातील नमुद केलेल्या प्रमाणे जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत. त्यांच्या पैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास रिक्त पदी नियुक्ती देणे बाबत निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार संदर्भीय क्रमांक 1 व 3 मधील नमुद केलेल्या तरतुदीनुसार जिल्हा परिषद परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रा.शि./प्रा.प./मु.अ. यांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र प्रा.शि./प्रा.प./मु.अ. यांची सदरील विनंती बदली प्रक्रियेसाठी सोबत दिलेल्या विहीत विकल्पपत्रामध्ये माहिती दिनांक 28.06.2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत गटशिक्षणाधिकारी यांचे स्तरावर सादर करण्यात यावेत.

जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रियेसाठी प्राप्त विकल्पपत्र संवर्ग निहाय (संवर्ग 1, संवर्ग 2, सर्वसाधारण) एकत्रित करुन दिनांक 29.06.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता संबंधित गटशिक्षणाधिकारी व संबंधीत आस्थापना प्रमुख, ऑपरेटर यांनी उपस्थित रहावे.

रिक्त पदांचा अहवाल येथे पहा

महत्वाच्या सुचना –

1. विनंती बदली प्रक्रियेमध्ये सादर करण्यात आलेल्या विकल्पपत्रामध्ये नमुद शाळेवर पदस्थापना दिल्यानंतर पदस्थापनेच्या

ठिकाणी उपस्थित होणे बंधनकारक राहील.

2. विनंती बदली प्रक्रियेमध्ये विकल्प पत्रामध्ये रिक्त असलेल्या शाळेचा 1 ते 10 पर्यंत विकल्प सादर करण्यात यावा,

3. विकल्प पत्रातील सादर केलेल्या 1 ते 10 पर्यायापैकी एकही शाळा न मिळाल्यास कार्यरत असलेल्या ठिकाणीच पदस्थापना कायम राहील.

4. सोबत दिलेल्या रिक्त पदांचा अहवालानुसारच रिक्त असलेले पदे विकल्प पत्रात सादर करण्यात यावे.

5. उक्त नमुद केलेल्या कालावधीमध्ये संबंधित पात्र प्रा.शि. प्रा.प. मु.अ. यांनी विकल्प सादर न केल्यास सदर विनंती बदली प्रक्रियेसाठी संबंधिताचा नकार समजण्यात येईल.

सोबत. विनंती बदली विकल्प पत्र नमुना व रिक्त पद अहवाल.

(

Leave a Comment