शिक्षककन्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राबवलेले शिक्षकांच्या बदलीचे सांगली मॉडेल राज्याला आदर्शवत teacher request transfer
सांगली जिल्हा परिषदेत आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी 21 जून 2023 शासन आदेशानुसार अतिशय उत्तम व राज्याला आदर्शवत बदली धोरण केले…खरेतर शिक्षकांचे बदली धोरण तयार करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या गेल्या…पण शिक्षकांची सोय व विद्यार्थ्यांचे हित दोन्हींचा समन्वय साधणारे धोरण सांगली जिल्ह्यात झाले व त्याची कठीण अंमलबजावणी संपूर्ण प्रशासनाने निर्धारपूर्वक केली…शिक्षककन्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राबवलेले शिक्षकांच्या बदलीचे सांगली मॉडेल राज्याला आदर्शवत आहे.
*एका शिक्षक माता पित्याची मुलगी म्हणून शिक्षकांच्या इतक्या चांगल्या पद्धतीने अडचण समजून घेवून त्यांची सोय करणाऱ्या शिक्षक कन्येला मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांना सलाम.. जी गोष्ट जवळपास अशक्य वाटत होती ती इच्छा शक्तीच्या जोरावर मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी करून दाखवली.शिक्षक सोयीत असेल तर तो अधिक चांगले काम करेल या सूत्राने आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देवून संवर्ग 5 निर्माण करत जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला ज्येष्ठतेनुसार बदलीची संधी दिली.. राज्याला शिक्षकांचे आदर्श बदली धोरण यानिमित्ताने मिळाले आहे… ग्रामविकास विभाग निश्चित शिक्षक बदलीच्या सांगली मॉडेलचा विचार करेल…*
जेव्हा शिराळा मधील दुर्गम भागात पाच सात वर्षे छोट्या शाळेत काम एकटेच काम करणाऱ्या शिक्षकांना आपली शाळा शून्य शिक्षकी होईल त्यामुळे बदली देतील की नाही असे वाटत असताना त्यांनी दुर्गम भागात केलेल्या सेवेचा विचार करून त्या शाळा शून्य शिक्षकी झाल्या तरी नवीन आलेले शिक्षक तेथे देवून त्यांना बदली देण्यात आली.ज्या शिक्षकांनी दीर्घ काळ इतर जिल्ह्यात नोकरी करून सांगलीत आले तेव्हा त्यांना सक्तीने शून्य शिक्षकी शाळेवर दुर्गम भागात शाळा दिल्या त्यांची सेवेची एक वर्षे पूर्ण होत असताना संवर्ग 5 निर्माण करून त्यांना बदलीची संधी देवून त्यांना बदली दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू पाहिले तेव्हा ही बदली किती गरजेची होती लक्षात आले… आदरणीय सीईओ मॅडम यांनी संवर्ग 5 निर्माण करण्याचा निर्णय का घेतला याची प्रचिती आली…
काही महिला भगिनी दीर्घ काळ गैरसोयी मध्ये होत्या त्यांच्याबाबतीत ही घेतलेले निर्णय निश्चित खूप महत्वाचे होते…
उर्दू शाळा मध्ये काही शाळा शून्य शिक्षकी होत्या त्यांच्या समुपदेशन मध्ये सर्व शाळा मध्ये शिक्षक उपलब्ध करून देत शाळांची अडचण दूर करण्यात आली.कन्नड शाळा मध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या बदल्या करताना काही मर्यादा निश्चित आल्या… पण त्यातूनही जेथे शक्य तेथे बदल होत सोयी झाल्या… शाळा शून्य शिक्षकी होऊ नयेत याची काळजी घेण्यात आली.
अशी अनेक सांगता येतील.. सोयीत आहे त्याची अधिकची सोय झाली नाही म्हणजे प्रक्रिया चुकीची असे नाही…कमी पटाच्या शाळेत बदली दिली नाही म्हणजे बदली चुकीची असे नाही…
जिल्ह्यात जवळपास 1000 पदे रिक्त आहेत त्यामुळे आजही बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत.अनेक ठिकाणी चार वर्ग एक शिक्षक ही स्थिती आहे.लहान शाळांच्या मध्ये पट संख्येचा निकष न लावता चार वर्ग असल्याने दोन शिक्षक द्यायला हवेत…पण यासाठी शिक्षक भरती हा एकमेव मार्ग आहे….संच मान्यता नियम बदलले तर या लहान शाळांचे मोठे नुकसान होणार असल्याने संच मान्यता धोरण बदलणार नाही यासाठी शिक्षक संघटना म्हणून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे…
कित्येक शाळा शून्य शिक्षकी होत्या…आता मात्र जिल्ह्यात एकही शून्य शिक्षकी शाळा उरली नाही…जिल्ह्यात शाळांमध्ये शिक्षक सम प्रमाण करण्याचा प्रयत्न बदली मधून करण्यात आला…जेथे जास्त विद्यार्थी तेथे शिक्षक मिळतील यासाठी प्रयत्न प्रशासनाने केले…. शिक्षकांची सोय होय असताना शाळा ही टिकल्या पाहिजेत ही भूमिका सर्वांची असली पाहिजे….. शिक्षक सोय व शाळांची गरज यामध्ये प्राधान्य देताना शाळांची गरजेला प्राधान्य दिले त्यामुळे अगदी अपवादात्मक अधिक सोय झाली नाही तरी बहुतांश ठिकाणी शक्य तेथे दोन्ही बाबी साध्य झाल्याचे जाणवले…
स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक शिक्षकांशी संवाद साधत त्यांची अडचण समजून घेत त्यांना स्मुपदेशित करण्याची ही पहिलीच वेळ असेल…रात्री 11 झाले तरी गडबड न करता प्रत्येकाला ऐकून घेतले जात होते… बदली कशासाठी हवी हे विचारले जायचे त्यावेळी काही जणांची अतिशय गरजेची कारणे असायची तर काही जणांची कारणे ऐकून सभागृह खळखळून हसायचे… कही खुशी कही गम असे काही चित्र असायचे…अनेक पती पत्नी यांना एका शाळेत किंवा जवळपास शाळेत बदल्या देवून त्यांची सोय करण्यात आली…सोलापूर,मराठवाड्यातील शिक्षकांना आटपाडी,जत मध्ये शाळा दिल्याने त्यांची सोय झालीच पण पूर्वभागात जेथे कायम शिक्षक जाण्यास टाळाटाळ करत होते…सक्तीने शिक्षक पाठवावे लागत होते…त्या शाळा आनंदाने बदली घेवून लोक जात होते… काही कमी पटाच्या शाळा देण्याबद्दल शिक्षक आग्रही असायचे त्या धोरण म्हणून 20 पेक्षा कमी पटावर प्रशासनाने शिक्षक दिले नाहीत त्यावेळी काही जणांनी शून्य शिक्षकी शाळा आपल्या भागात असल्याने मागून घेतल्या….
*पहिल्या दिवशी प्रक्रिया झाली एका शिक्षक ग्रुप वर काही जणांनी प्रक्रिये बाबत उलट सुलट लिहिले…उलट लिहिणारे एक शिक्षक दुसऱ्या दिवशी बदलीसाठी आले.तेव्हा त्यांना अपेक्षित शाळा मिळाली… संध्याकाळी ग्रुप वर त्यानी गावात फटाक्या लावून बदलीनंतर स्वागत झाल्याची पोस्ट केली…तिसऱ्या दिवशी तेच शिक्षक संघटना प्रतिनिधी म्हणून प्रक्रियेत होते तेव्हा त्यांना विचारले परवा तर सगळ चुकीचे आणि काल फटाके लावून स्वागत… आज सगळ्या प्रक्रियेत तुम्ही सहभागी आता तुमचे मत काय??तेव्हा त्यांनी प्रांजळपणे कबूल केले..मला काही लोकांचे फोन आले त्यावरून मी बोललो…पण इथे आल्यावर वस्तुस्थिती पाहिली तेव्हा इतकी छान प्रोसेस होवूच शकत नाही…सर्वांचे समाधान कधीच होणार नाही… पण शक्य तेवढे शाळा व शिक्षकांचे हित बदली प्रक्रियेने झाले आहे.माझी चूक झाली असे त्यांनी मान्य केले…*
बदली मधील पाच दिवस निश्चित खूप अनुभव देणारे होते… याबाबत नंतरही लिहिता येईल…एकंदर एक ऐतिहासिक बदली प्रक्रिया गेल्या पाच दिवसात पार पाडली…या बदलीचे धोरण व प्रत्यक्ष अंमबजावणी यात खारीचा वाटा उचलता आला याचा निश्चित अभिमान आहे… बदली ही सतत चालणारी प्रक्रिया आहे…ज्यांची बदली झाली व ज्यांची झाली नाही…दोघांना शुभेच्छा!!!जे आजही इच्छित ठिकाणी जावू शकले नाहीत त्यांना भविष्यात भरती होईल तेव्हा अपेक्षित बदली मिळावी यासाठी प्रयत्न नक्की करू…आजही काही शिक्षक जे मिरज,पलूस तालुक्यातील आहेत त्यांना त्यांचा स्वतःचा तालुका मिळाला नाही..दीर्घ काळ ते बाहेरील तालुक्यात काम करत आहेत…सोलापूर भागातील शिक्षकांना आटपाडी,जत कडे जागा रिक्त असल्याने पदस्थापना मिळाल्या पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना अंतर कमी करत तासगाव पर्यंत येता आले…मिरज,वाळवा मध्ये त्यातील बऱ्याच जणांना येता आले नाही…त्यांनाही भविष्यात संधी मिळेल…पण या बदली मधून हेही समजले जेव्हा केव्हा अशी संधी मिळेल तेव्हा पुन्हा जे आज बदलीने सोयीत आले आहेत त्यांचे अर्जही असतीलच कारण अधिकची सोय व्हावी हा मानवी स्वभाव…
ही सगळी प्रक्रिया निर्विघ्न व पारदर्शी पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे साहेब व सामान्य प्रशासन विभाग सर्व प्रक्रियेत सहभागी स्टाफ,शिक्षण विभागातील सर्व उपशिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,कक्ष अधिकारी,अधीक्षक,वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक,शिपाई कर्मचारी सगळ्यांना धन्यवाद….आपली मेहनत आम्ही अनुभवली आहे…रात्री 11 नंतर आम्ही घरी जात होतो..पण रात्री 2 वाजे पर्यंत आपण झालेल्या बदल्यांचा आढावा,उद्याची तयारी करून सकाळी 8 वाजता आमच्या अगोदर सभागृहात असायचा मनापासून आपल्या मेहनतीला सलाम….(काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विशेष उल्लेख करायला हवा पण जाणीवपूर्वक करत नाही… कारण हे टीम वर्क आहे…)
नवीन शैक्षणिक वर्षात आपण आपल्या शाळेत अधिक ताकतीने काम करत शाळांची गुणवत्ता वाढवू… पट आपोआप वाढेल.
*14 तारखेला सकाळी 9 ते 15 तारखेला पहाटे 4 वाजेपर्यंत सलग 19 तास जिल्हा परिषदेत समुपदेशन घेत बदली व नवीन शिक्षक पदस्थापना पार पाडणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांना सलाम…सलग सहावा दिवस शिक्षक बदली व पदस्थापना देण्यासाठी सकाळी 9 ते रात्री उशिरा पर्यंत मॅडम सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित… पहाटे 1.32 वाजता वसंतदादा सभागृहात घेतलेला हा फोटो खूप बोलका आहे… पहाटे 4 पर्यंत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी 19 तास सलग काम करत होत्या…त्यांच्या सोबत शिक्षणाधिकारी साहेब व सर्व स्टाफ यांना मनापासून सलामऐतिहासिक बदली व पदस्थापना प्रक्रिया…