प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या उद्यापासून : जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण teacher request transfer
लोकमत न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या बदल्यांची प्रक्रिया एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. ही प्रक्रिया आता उद्या गुरुवार, दि. २० जूनपासून सुरू होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी ही माहिती दिली.
आधीच्या नियोजनानुसार ही प्रक्रिया आज बुधवारी होणार होती. परंतु, कार्तिकेयन यांना तातडीच्या बैठकीसाठी मुंबईला जावे लागले असल्याने ही प्रक्रिया एक दिवसाने उशिरा सुरू होणार आहे. २० ते २३ जूनदरम्यान संवर्गनिहाय या बदल्या होणार आहेत. गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पातळीवर या बदल्यांच्या प्रक्रियेची लगबग सुरू होती. विविध संवर्ग, प्राधान्यक्रम आणि विषयानुसार शिक्षकांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. संवर्गनिहाय बदलीपात्र शिक्षकांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या असून, ३ हजार ५०० शिक्षकांनी बदल्यांची मागणी केली आहे. मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी प्रक्रिया सुरू होणार आहे.
बदलीचे वेळापत्रक
■ २० जून/ संवर्ग १ मधील
शिक्षकांच्या बदल्या
• २१ जून / संवर्ग २ व ३ मधील
शिक्षकांच्या बदल्या आणि संवर्ग चारमधील विषय शिक्षकांच्या बदल्या
२२ जून/ संवर्ग ४ मधील
अनुक्रमांक १ ते १००० पर्यंतच्या शिक्षकांच्या बदल्या
• २३ जून/संवर्ग ४ मधील
अनुक्रमांक १००१ ते पुढील सर्व शिक्षकांच्या बदल्या
एकीकडे कोल्हापूर जिल्हा
परिषदेचे बदल्यांचे वेळापत्रक जाहीर होत असताना दुसरीकडे ऑनलाइन शिक्षक बदल्यांचा शासन आदेश मंगळवारी संध्याकाळी निघाला. यामुळे काही काळ शिक्षक संघटना नेते, शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनीही तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेतली आणि चर्चा केली. जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया ऑफलाइन असल्याने नवा आदेश या प्रक्रियेवर परिणाम करू शकत नसल्याचे स्पष्ट केले.