शिक्षक नियुक्ती,बदलीसाठी झेडपी २० तास जागली :सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्यासह कर्मचारी दिवस-रात्र राबले teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक नियुक्ती,बदलीसाठी झेडपी २० तास जागली :सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्यासह कर्मचारी दिवस-रात्र राबले teacher request transfer

सांगली :पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हांतर्गत बदल्या आणि शिक्षण सेवकांच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषद इतिहासात पहिल्यांदाच सुमारे २० तास जागली. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत झेडपीत तळ ठोकून होते.

शिक्षकांची आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षण सेवकांना नियुक्तीच्या सूचना शासनाकडून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये पाच दिवसांपासून जिल्हांतर्गत विनंती बदली प्रक्रिया सुरू होती. सकाळी नऊपासून ते रात्री दहा-साडेदहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर पवित्र पोर्टलमधून ■ आलेल्या शिक्षण सेवकांना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता झेडपीच्या सभागृहात नियुक्तीसाठी

आले होते. सीईओ, शिक्षणाधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरुवातीला नव्या शिक्षकांना समुपदेशन केले. त्यानंतर माध्यमनिहाय नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आले.

नियुक्ती कोठे होईल, याची मनात धाकधूक, पहिलाच अनुभव, चेहऱ्यावर उत्सुकता आणि शासकीय सेवेत रुजू होतोय याचा आनंद… अशा धाकधुकीच्या वातावरणात उर्दू माध्यमापासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशनाला सुरुवात झाली. विविध शाळांत उपलब्ध जागा पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आला होता. त्या माध्यमासाठी पात्र असलेले उमेदवार हातात माईक घेऊन शाळेची अपेक्षा व्यक्त करीत होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सोय पाहून नियुक्त्या देण्यात येत होत्या. नियुक्ती झालेल्या उमेदवारांची तातडीने ऑर्डरही टाईप करण्याच्या कामाला यंत्रणा लागली होती. मध्यरात्रीनंतर कन्नड माध्यमाच्या नियुक्तीला सुरुवात झाली. रात्र झाल्याने अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांचे डोळे तारवटले होते. मात्र काहीही झाले तरी नियुक्तीशिवाय झेडपीचे कार्यालय

सोडायचे नाही, असा जणू चंगच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बांधला होता.

शिक्षकांची सोय आणि विद्यार्थ्यांचे हित दोन्हीचा समन्वय साधून सीईओ घोडमिसे नियुक्ती देत होत्या. नियुक्ती मिळाल्यानंतर निघून जा, मोबाईलवर पत्र देण्याची सूचना देण्यात येत होती. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी नियुक्ती घेऊन शिक्षक आनंदाने कार्यालयाच्या बाहेर पडत शनिवारी सर्व शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यासाठी ऑर्डर देण्यासाठी शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली होती. ऑर्डर तयार होतील तशा सीईओ धोडमिसे सह्या करीत होत्या. जेवण, विश्रांती, झोप सगळं विसरून यंत्रणेतील प्रत्येकजण काम करीत होता. काहीजणांना झोप आवरेना, म्हणून टेबलावर, खुर्चीवर बसून काहीकाळ ते विश्रांती घेत होते. सर्व उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देऊन सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी शनिवारी सकाळी पाच- साडेपाच वाजता झेडपीच्या कार्यालयातून बाहेर पडले. कित्येक महिन्यांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण होताना पाहून अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. नियुक्ती मिळालेले सर्व शिक्षक शाळेच्या पहिल्याच दिवशी

Leave a Comment