जि.प.शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्यांमध्ये अनियमितता:विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या समितीने ठेवला ठपका teacher request transfer
जिल्हा परिषद, छन्त्रपती संभाजीनगर येथील शिक्षक संवर्गातील ऑफलाईन पदस्थापना बदलून दिल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार नियमोचित कार्यवाही करणे बाबत…..
संदर्भ :
(१) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः जिपब-४८२०/प्र.क्र. २९०/आस्था-१४, दि.०७ एप्रिल, २०२१.
(२) श्री. बाबुराव गाडेकर राज्य कार्यकारी अध्यक्ष व राजेश सुर्वे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.व./न.पा./म.न.पा.), यशोधन निवास, प्रभात नगर, पोलादपूर, रायगड यांचे निवेदन दि.१६/११/२०२३.
(३) श्री. राजेश सुर्वे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना यांचे निवेदन दि.१७/११/२०२३.
(४) वाजेद असलम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती, सरफराज नगर, व्ही.आय.पी. हौसिंग सोसाईटी, फाजिलपुरा, कलेक्टर ऑफीस, छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन दि.१६/११/२०२३.
(५) असलम खान जुमा खान पठाण, मोमीनपुरा गल्ली नं.४, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन दि.२३/११/२०२३.
(६) प्रस्तूत कार्यालयाचे आदेश जा.क्र.२०२३/जि.प./आस्था-२/चौकशी समिती/कावि-४२८, दि.२६/१२/२०२३.
(७) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदल्या बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने चौकशी समितीने प्रस्तूत कार्यालयास सादर केलेला ‘चौकशी अहवाल’ दि.२७/०३/२०२४.
संदर्भ क्र. (२), (३), (४), (५) व इतर तक्रारदारांनी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक संवर्गातील पदस्थापना / बदल्यांच्या अनियमित्तेबाबत प्रस्तूत कार्यालयास तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींच्या अनुषंगाने सविस्तर व सखोल चौकशी करण्याकरिता संदर्भ क्र. (६) अन्वये प्रस्तूत कार्यालयामार्फत ‘चौकशी समिती’ गठीत करण्यात आली होती.
सदर समितीने तक्रारनिहाय प्रकरणांची चौकशी करुन संदर्भ overline sh .(19) अन्वये ‘चौकशी अहवाल’ प्रस्तूत कार्यालयास सादर केलेला असून सदर चौकशी अहवालाची छायांकित प्रत या सोबत जोडली आहे. सदर चौकशी अहवालात नमूद बाबी व निष्कर्षानूसार नियमोचित कार्यवाही आपल्यास्तरावरुन करण्यात येवून सबंधित तक्रारदार यांना अवगत करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल प्रस्तूत कार्यालयास सादर करावा.