सन २०२४ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करणेबाबत बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवर घेणेत आलेल्या आक्षेपांच्या सुनावणीबाबत teacher request transfer
संदर्भ :- १. इकडील पत्र क्रं. कोजिप/शिक्षण/कावि-१९/जिल्हातंर्गत बदली/२०२४ दिनांक १४/५/२०२४
उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरुन, सन २०२४ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करणेबाबत संवर्ग १, संवर्ग २, संवर्ग ३ व संवर्ग ४ च्या याद्या प्रसिध्द करणेत आल्या असून सदर याद्यावर शिक्षकांचे आक्षेप असतील तर सदरचे आक्षेप या कार्यालयाकडे सादर करणेबाबत कळवणेत आले होते.
त्यानुसार सर्व गटस्तरावर अमान्य केलेले व जिल्हा स्तरावर सादर केलेले एकूण ४५ आक्षेपांची यादी या कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. अमान्य केलेले व जिल्हा स्तरावर सादर केलेले आक्षपांची सुनावणी दिनांक ३/६/२०२४ रोजी दूपारी ३.०० वाजाता आयोजित करणेत आली होती.
सुनावणी अंती सदर आक्षेप जिल्हास्तरावर मान्य/अमान्य करणेत आले असून सोबत यादी जोडली आहे. अमान्य करणेत आलेले आक्षेपाबाबत संबंधितांना दिनांक १०/६/२०२४ रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दाद मागता येईल. मा. मु. का. अ. यांचेकडे दाद मागणारे शिक्षकांची कागदपत्रे ग. शि. अ. यांनी एकत्रितपणे या कार्यालयाकडे दि. १०/०६/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावीत.
