जिल्हांतर्गत बदलीसाठी कार्यरत इच्छूक शिक्षकांना विकल्पानुसार संधी देऊन बदली प्रक्रिया राबविणेबाबत teacher request transfer
संदर्भ
:- १. ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४ दिनांक ०७/०४/२०२१.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१दिनांक २१/०६/२०२३.
३. मा. उपसचिव, ग्रामविकास विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४ दिनांक ११/०३/२०२४.
४. . मा. कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४ दिनांक १७/०५/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक ०३ अन्वये संदर्भ क्रमांक ०२ च्या शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करावी. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक ०२ च्या शासन निर्णयामधील मुद्या क्रमांक ०२ मध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठीजे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशानाव्दारे संभाव्या भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. अशी तरतुद आहे.
त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक ०२ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागा असल्यास समुपदेशनाव्दारे पदस्थापना देण्याची संधी देणेस्तव बदली इच्छूक असलेल्या शिक्षकांना आपल्याकडे दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत विकल्पासह अर्ज सादर करणेबाबत आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे. बदलीसाठी इच्छूक शिक्षकांचे विकल्पासह अर्ज प्राप्त माहिती सेवापुस्तकाची तपासणी करुन अचूक माहिती पदनाम नुसार व अवघड क्षेत्र यांची स्वतंत्र प्रपत्रामध्ये पत्रासोबतच्या विहित नमुण्यात DVB-TTSurekh या फॉन्ट मध्ये संकलित करुन हार्ड कॉपी व सॉफट कॉपी या कार्यालयास दिनांक ०५ /०६/२०२४ रोजी सादर करावी. सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.