जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया राबविण्यास परवानगी मिळणे बाबत teacher request transfer
संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन, ज्येष्ठतेनुसार शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची मुख्याध्यापक व पदवीधर रिक्त पदावर पदोन्नती व जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया राबविण्यास परवानगी मिळणे बाबत.
संदर्भ :- 1)
ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब-511/प्र.क्र.54/आ-14 दि. 12/05/2011
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.174/टीएनटी-1दि. 21/06/2023
3) मा.उप सचिव, ग्राम विकास विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.45/आस्था-14 दि.11/03/2024
4) पवित्र प्रणालीद्वारे अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-2022 आधारे जि.प. जालना व्यवस्थापन निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक 25/02/2024.
5) मा.आयुक्त (शिक्षण), म.रा. पुणे-1 यांचे पत्र क्र. 1408 दि.25/02/2024 व क्र.2770 दि.19/04/2024
6) मा. कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र.184/टिएनटि-1 दिनांक
19/04/2024
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16/04/2024 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक भरती संदर्भात शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, 2022 मधील गुणांकनाच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत पहिल्या टप्पयामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शिफारशित ठिकाणाच्या त्या-त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही करणे बाबत संदर्भ क्रमांक (05) व (06) अन्वये कळविण्यात आलेले आहे.
जालना जिल्ह्याची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया दिनांक 13/05/2024 रोजी पूर्ण झालेली आहे. संदर्भ क्रमांक (03) च्या पत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 21/06/2023 शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. अशा सुचना आहेत. सदरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक (02) मध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. अशी तरतूद आहे. तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांनी संगणक प्रणालीद्वारे संच मान्यता सन-2022 (शिक्षक पदनिश्चिती) दिनांक 01/03/2024 अन्वये उपलब्ध करून दिलेली आहे. सदरील संच मान्यतेनुसार संदर्भ क्रमांक (01) च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रिक्त पद असलेल्या शाळेवर समायोजन करणे व मुख्याध्यापक व पदवीधर संवर्गात रिक्त असलेली पदे पात्र शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
संदर्भ क्रमांक (05) व (06) अन्वये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाच्या पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीने पदस्थापना देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे संदर्भ क्रमांक (01) च्या शासन निर्णया मधील तरतुदीनुसार संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे, मुख्याध्यापक व पदवीधर रिक्त पदे पदोन्नतीने भरणे व संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयातील तरतूदी व संदर्भ क्रमांक (03) च्या पत्रातील निर्देशानुसार जिल्हातंर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया पुर्ण झालेली असल्याने उक्त नमूद सर्व प्रक्रिया राबविण्यास कृपया परवानगी मिळावी, ही विनंती.