‘आचारसंहिता शिथिल होताच शिक्षक समायोजन, बदली प्रक्रिया व्हावी’ teacher request transfer
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा आचारसंहिता शिथिल होताच शिक्षक समायोजन, बदली व सर्व प्रकारच्या पदोन्नती व्हाव्यात, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना दिले. यावेळी समायोजन व बदली प्रक्रिया करण्याचे नियोजन प्रशासनाचे असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले.
गेली तीन वर्षे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्याने एका-एका शाळेत आवश्यकतेपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत. अशा
अतिरिक्त शिक्षकांची समायोजन
प्रक्रिया लोकसभा निवडणूक
आचारसंहिता शिथिल होताच पूर्ण
केली जावी. अतिरिक्त शिक्षकांचे
समायोजन मे २०११ च्या शासन
निर्णयानसार प्रथम तालुका स्तरावर क
आवश्यकता भासल्यास जिल्ह
स्तरावर समायोजन अतिरिक्त शिक्षक
समायोजन, नंतर जिल्हांतर्गत बदल्य
व्हाव्यात, अशी मागणी निवेदनात
करण्यात आली आहे. यावेळ
संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील
राज्य संघटक पी. आर. पाटील, जिल्ह
नेते शंकर पवार, जिल्हा सरचिटणीस
तुषार पाटील आदी उपस्थित होते.
बदली नमुना टाकावा