शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer

संदर्भ :

– १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टीएनटी-१ दि. २१/०६/२०२३.

२) मा.उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई पत्र क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१ दिनांक ६/३/२०२४.

३) मा.उप सचिव ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे पत्र क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ४५/आस्था-१४ दिनांक ११/०३/२०२४.

४) या कार्यालयाचे पत्र क्र.जिपअ/शि/स्थाडी-१/३१४३/२०२४ दिनांक १६/०४/२०२४.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय-१ अन्वये जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्याबाबत नमुद आहे. त्यानुसार संदर्भिय-२ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश प्राप्त आहेत.

मेळघाट क्षेत्रात शिक्षकांच्या बऱ्याच जागा रिक्त असल्यामुळे प्रथम मेळघाटमधील रिक्त जागा भरणे क्रमप्राप्त असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदलीकरिता कार्यरत शिक्षकांपैकी इच्छूक शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीने पदस्थापना पाहिजे असल्यास अशा शिक्षकांचे अर्ज आपले स्तरावरून संकलित करून त्यांची एकत्रित यादीसह अर्ज या कार्यालयास सादर करण्याबाबत संदर्भिय-४ अन्वये आपणास कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार पंचायत समितीमार्फत अर्ज प्राप्त होत नसून परस्पर या कार्यालयास अर्ज सादर करण्यात येत आहे.

यास्तव आपणास सूचित करण्यात येते की, कार्यरत शिक्षकांपैकी इच्छूक शिक्षकांचे मेळघाट आदिवासी क्षेत्रात बदलीने पदस्थापना पाहिजे असल्याबाबतचे विनंती अर्ज/माहितीचे प्रपत्रासह आपले स्तरावरून संकलित करून आपले स्वाक्षरीसह या कार्यालयास दिनांक ०७/०५/२०२४ रोजी सादर करावेत.

teacher request transfer
teacher request transfer

Leave a Comment