जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ teacher request transfer 

संदर्भ:- १) महाराष्ट्र शासन प्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रः

जिपब- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४. दिनांक- ७ एप्रिल २०२१.

२) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१, दि.२१/०६/२०२३

३) या कार्यालयाकडील पत्र क्र.जा.क्र/प्राशिवि/आस्था-२/वशि-३३६९/२०२४, दि.०८/०३/२०२४

४) मा. उपसचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण -२०२४/प्रक्र. ४५/आ-१४, दि.११/०३/२०२४.

उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील नमूद शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबत शासनाने सुधारित धोरण निश्चित केले आहे.

सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्र २ व ४ अन्वये, जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांचा विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी असे सूचित करणेत आलेले आहे.

त्यानुसार, यापुर्वीच आपलेकडून वरील संदर्भ क्र ३ चे या कार्यालयाकडील पत्रान्वये वरीलप्रमाणे पात्र शिक्षकांची माहिती मागणी करणेत आलेली आहे.

तथापि, सदर बाबत आपणास सूचित करणेत येते की, खालील नमूद बाबी अवलोकनी घेवून आपण जिल्हांतर्गत विनंती बदलीकामीचे आपलेकडील यापुर्वीचे विनंती अर्ज व नव्याने प्राप्त झालेले विनंती अर्जाची माहिती त्यांचे पात्र/अपात्र तसेच तालुकांतर्गत/तालुकाबाहय असे शेरे नमूद करून पुनःश्च विहीत नमुन्यामध्ये सादर करणेची आहे. सदरची माहिती सॉफ्टकॉपी तसेच स्वाक्षरीत हार्डकॉपी मध्ये पाठविणेची असून, सदर माहितीकामी खालील महत्वाच्या सूचनांचे पालन करणेचे आहे:-

१) दि.३१ मार्च २०२४ अखेर बदलीसाठी पदावधीचा व परिगणना कालावधी ग्राहय धरावा.

२) विशेष संवर्ग भाग १ (Cadre-१), विशेष संवर्ग भाग २ (Cadre-२), बदली अधिकार प्राप्त (Entitel), बदलीस पात्र (Eligible) या सर्व संवर्गासाठी शिक्षकाची कार्यरत शाळेमधील सेवा किमान ३ वर्ष अनिवार्य आहे.

जिल्हा परिषदेचे पत्र 👇👇

जिल्हा परिषद सांगली यांचे पत्र येथे पहा pdf download

३) वरील संवर्गामध्ये पात्र होत नसनारे व विनंती बदली साठी अर्ज करणारे शिक्षक इतर (Other) या सवंर्गामध्ये येतील

४) बदली अधिकार प्राप्त (Entitel) साठी दि.१३/१०/२०२२ रोजी घोषित करणेत आलेली अवघड क्षेत्र यादी ग्राहय धरावी.

Teacher request transfer
Teacher request transfer

Leave a Comment