शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक अशा प्रकारे होणार भरती परिपत्रक जाहीर teacher recruitment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
teacher recruitment
teacher recruitment

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक अशा प्रकारे होणार भरती परिपत्रक जाहीर teacher recruitment

दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावर सुरु आहे. आज अखेर प्राप्त माहितीनुसार ४४७४ अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत, त्यातील ४०९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत.

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक २०/०५/२०२४ रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे.

त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्ता पूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पद भरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्यात येत आहे.

समांतर फेरी, न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबीसंदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासंदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.

समाज माध्यमांद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात. कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी.

ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्या वेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

teacher recruitment 
teacher recruitment

Leave a Comment