जिल्हाअंतर्गत / आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बाबत teacher online transfer portal
हसरी दुनिया / बुलडाणा
बोगस दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन विविध सवलती, योजनांचा फायदा घेणान्या बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले होते, पण त्यावर. अद्याप ही कारवाई झाली नाही. त्यामुळे या बोगस प्रमाण पत्र धारकांमुळे २२ वर्ष सेवेनंतरही स्वतः च्या तालुक्यात बदलीसाठी अन्याय होत असल्याने सर्व अंपग प्रमाणपत्र धारकांची मेडीकल बोर्डासमीर तपासणी करून बोगस अंपग शिक्षकांवर कार्यवाहीची मागणी नांदुरा पंचायत समिती अंतर्गत बेलोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रामदास तेजराव उबरहंडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरु-शिष्य नात्याच्या अनेक कहाण्याही प्रसिद्ध आहेत. गुरुसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शिष्याचे दाखलेही इतिहास व पुराणात दिले जातात. आजही गुरुजींबद्दल आदर आहे. पण, काही स्वार्थी शिक्षकांमुळे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ज्यांनी नैतिकतेचे धडे द्यायचे, त्यांनीच विचार सोडले, मग, त्यांच्या तालमीत तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आदर्श नागरिक होण्याची अपेक्षा कशी करायची, असा सवाल प्रामाणिक शिक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. बनावट दिव्यांग दाखवून संवर्ग एकचा लाभयेणाऱ्या शिक्षकांविरोधात राज्य शासनाकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक गुरुजींवर कारवाई
करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी शिक्षण विभागाने दखल घेत असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आयुक्तांना दिले होते. पण तरीही कारवाई न झाल्यामुळे बोगस दिव्यांग शिक्षक हे सरकारच्या तावडीत कधी सापडतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तोपर्यंत प्रामाणिक असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होतच राहील. कधीही खोटे बोलू नये, असे सांगणाऱ्या शिक्षकांनीच दिव्यांग असल्याच्या खोट्या प्रमाणपत्राचा आधार घेत स्वतः च्या बदल्या करून घेतल्या. आता बोगस दिव्यांग शिक्षकांवर कार्यवाही व्हायलाच हवी, अशी मागणी होत आहे. खोटेपणा करणाऱ्यांची बाजू घ्यायची की
शिक्षक रामदास तेजराव उबरहंडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दि. १७ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी नियुक्ती दि.५ मार्च २००३ या वर्षी झाली असून आतापर्यंत २२ वर्ष वर्षी सेवा झालेली आहे. परंतु बोगस अपंग प्रवर्ग ४ मधील शिक्षकांवर अन्याय होत आहे. चिखली, बुलडाणा व मोताळा तालुक्यात तर ७५% बोगस प्रमाणपत्र धारक शिक्षक आहेत. त्यामुळे अशा प्रवर्ग ४ मधील माझ्या सारख्या शिक्षकांना स्वतःच्या तालुक्यात बदलून येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले आहे, तरी विकल्प करण्या अगोदर अपंग प्रमाणपत्र धारकाची मेडीकल बोर्डासमोर तपासणी करण्यात यावी, तसेच बोगस अंपग धारकांवर कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षक रामदास उबरहंडे यांनी केली आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा, यासाठी पालकांना पुढाकार घ्येण्याचे वेळ आली आहे, गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, पूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांकडून ज्ञानाचे धडे गिरवून घेण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे. आताचे काही
गुरुजी मात्र वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. अशा बोगस लाभघेणाऱ्या शिक्षकांची उच्चस्तरीय तपासणी व्हावी, अशी मागणी बदल्यांमध्ये अन्याय झालेल्या शिक्षक रामदास तेजराव उबरहंडे यांनी केली आहे.