ग्रामविकास व पंचायत राज या विभागाची शिक्षक बदली संदर्भात बैठक मा.ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली teacher online transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामविकास व पंचायत राज या विभागाची शिक्षक बदली संदर्भात बैठक मा.ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली teacher online transfer portal 

मंत्रालयातील परिषद सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज या विभागाच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभागी झालो. ही बैठक ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली.

दरम्यान विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येतील. यावेळी माझ्यासह आमदार श्री. राहुल कुल, आमदार श्री. सत्यजीत तांबे यांच्यासह ग्रामविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, उप सचिव, सह सचिव, शाळेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उप सचिव श्री. तुषार महाजन, श्री. बळवंत पाटील उपस्थित होते.

या बैठकीत खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१. जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी ३१ मे ऐवजी ३० जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवावी.

२. शा.नि. २०२२ मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या. त्यामुळे २०२२ मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमतील शिक्षकांना २०२५ च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी.

३. आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची किंवा त्यांच्या आपसी शिक्षकाची पुर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ग्राह्य धरुन त्यांची जिल्हांतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी. (पदोन्नतीसाठी पुर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते.)

४. आंतरजिल्हा बदलीपुर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करावी. (शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि पदवीधर पदोन्नतीसाठी)

५. आंतरजिल्हा बदलीसाठी मागील वर्षाच्या संचमान्यतेनुसार रिक्त जागा कळावाव्या तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंतची निवृत्तीने सर्व रिक्त होणाऱ्या पदांचा यात समावेश आसावा.

६. आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात रोस्टरचा विचार करु नये.

७. आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी.

 

Join Now