जिल्हांतर्गत बदलीस पात्र शिक्षकांची बदली होणार जिल्हा परिषद; पवित्र पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया झाली सुरू teacher online transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हांतर्गत बदलीस पात्र शिक्षकांची बदली होणार जिल्हा परिषद; पवित्र पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया झाली सुरू teacher online transfer portal 

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील जिल्हांतर्गत बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची बदली होणार आहे. दरम्यान, पवित्र पोर्टलवर ऑनलाइन दाखल झालेल्या अर्जावर आता शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्व कार्यरत शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व व्हेरिफाय करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे. त्यानंतर २ मार्च ते ९ मार्चपर्यंत गटशिक्षणाधिकारी हे सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणी करून पुन्हा शिक्षकांकडे पाठवतील. गटशिक्षणाधिकारी यांनी व्हेरिफाय केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अॅप्रोवोल करणे गरजेचे आहे. शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांची अॅप्रोवोलची तपासणी करून पुन्हा शिक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी व्हेरिफाय केलेले प्रोफाईल शिक्षकांनी अॅक्सेप्ट केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाही असेही शिक्षण विभागाने कळविले आहे. ही प्रक्रिया ९ मार्चपर्यंत संपणार आहे.

शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर..

जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, अशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने सक्तीने स्वीकारतील. त्यानंतर १० मार्च रोजी शिक्षकांचे प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, त्यानंतर सीईओ सुनावणी घेऊन निर्णय घेतील.

कोणते शिक्षक ठरू शकतात बदलीस पात्र

बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या • शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १ किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित थरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यानंतर सेवा विद्यमान शाळेवर तीन वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक.

२. जिल्हा अंतर्गत बदली विशेष संवर्ग भाग २ मध्ये जर पती-पत्नी दोघे सेवेत असतील व सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. विशेष संवर्ग २ चा लाभघेतल्यानंतर विद्यमान शाळेवर तीन वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक.

१० मार्च

पात्र शिक्षकांची १० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवल्याने आर्थिक व्यवहारांना आळा बसून बदली प्रक्रियेतील भ्रष्टाचार संपुष्टात आला आहे.

ते ६ एप्रिलपर्यंत बदली प्रक्रिया राबविणार

Join Now