खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई ऑनलाईन बदलीमध्ये चुकीची माहिती भरल्याप्रकरणी teacher online transfer portal
वार्ताहर ; आंबवली खेड तालुक्यातील वाळंजगाव जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका दिपाली दत्ताराम पालवे यांनी ऑनलाईन बदलीमध्ये चुकीची माहिती भरल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना नुकतेच निलंबित केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये अपंग, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजार, पती-पत्नी एकत्रिकरण, ५३ वर्षावरील शिक्षक, सुगम-दुर्गम भागातील सेवा अशा धर्तीवर • बदल्या करण्याचा शासनाचा मानस असल्यामुळे तशा प्रकारे सर्व शिक्षकांची माहिती मागवण्यात आली. ऑनलाईन माहिती भरताना शिक्षिका दिपाली पालवे यांनी आपल्या मर्जीतील शाळा मिळवण्यासाठी खोटी माहिती शासनास सादर केली. यावर इतर शिक्षिकेने आक्षेप घेत माहिती सदोष असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिपाली पालवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून पुढील कारवाईचे आदेश होईपर्यंत पंचायत समिती, मंडणगड येथे हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.