जिल्हांतर्गत बदल्या २०२५ अचूक होण्यासाठी दिलेल्या पीडीएफ मधील खालील बाबी अतिशय काळजीपूर्वक तपासाव्यात teacher online transfer ott
१. महत्वाची सुचना-सदरच्या पिडीएफ या अंतिम नसून सन २०२३ चा बदली डाटा मधील आहेत. या मध्ये माहितीमध्ये दुरूस्ती असेल तर ती लाल पेनने करणे अवश्यक आहे.
२. नाव- नवामध्ये प्रथम स्वःताचे नाव, वडील / पतीचे नाव व शेवटी आडनाव असा क्रम आहे. ज्यांच्या नावत दुरूस्ती/ बदल असेल त्यांनी ती लाल पेनने करणे अपेक्षीत आहे.
३. वैवाहिक स्थिती- माहितीमध्ये बदल असेल तर UNMARRIED, MARRIED, WIDOW, DIVORSED, ABANDONED या पैकी एक लिहावे,
४. बदली पोर्टलवर नोदविलेला ई-मेल- माहितीमध्ये बदल असेल तर अचूक ई-मेल आयडी सुवाच्या अक्षरात नोंदवावा.
५. शालार्थ आय.डी.- ही माहिती अचूकच आहे. यात बदल होणार नाही.
६. पॅन क्रमांक- माहितीमध्ये बदल असेल तर अचूक पॅन क्रमांक सुवाच्या अक्षरात नोंदवावा.
७. आधार क्रमांक- माहितीमध्ये बदल असेल तर अचूक आधार क्रमांक सुवाच्या अक्षरात नोंदवावा.
८. जात प्रवर्ग- आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का ते तपासून दुरस्ती असेल तर सुवाच्या अक्षरात नोंदवावी.
९. निवडीचा प्रवर्ग- आपण प्रथम सेवेत रुजू होताना ज्या जातीचा प्रवर्ग मधुन आपली नियुक्ती झालो आहे तो जात प्रवर्ग बरोबर आहे का ते तपासून दुरस्ती असेल तर सुवाच्या अक्षरात नोंदवावी.
१०. मुळ सलग सेवा दिनांक- आपण शिक्षक म्हणून जेव्हा प्रथम नियुक्त झाला असाल तो दिनांक म्हणजे मुळ सलग सेवा दिनांक, अंतर जिल्हा बदली
झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील सलग सेवा दिनांक अपेक्षीत आहे.
११. अंजिब असल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील हजर दिनांक- या रकाण्यात सध्याच्या जिल्ह्यातील हजर दिनांक आहे. सदर दिनांक अचूक आहे का हे तपासावे. जर अंतरजिल्हा बदली झालेली असेल तर संबंधीत शिक्षकाची या रकाण्यातील दिनांक मुळ सलग सेवा दिनांकानंतरची असेल. जर अंतरजिल्हा बदली झालेली नसेल तर संबंधीत शिक्षकाची मुळ सलग सेवा दिनांक व अहिल्यानगर जिल्ह्यातील हजर दिनांक या दोन्ही तारखा सारख्याच असतील.
१२. सध्याच्या सोप्या / अवघड क्षेत्रातील हजर दिनांक- या रकाण्यात बदली जी. आर. च्या संबोधाप्रमाणे अवघड क्षेत्र व सोपे क्षेत्र यांतील ज्या क्षेत्रात आपली शाळा येते त्या क्षेत्रात प्रथम रुजू झाल्याची दिनांक नमूद आहे.
१३. सध्याच्या शाळेतील हजर दिनांक- या रकाण्यात शिक्षकांची सध्याच्या शाळेत रुजू दिनांक आहे. याबाबत अत्यंत महत्वाचे असे की, अंजिब ने हजर झालेल्या शिक्षकाची जिल्ह्यातील ही पहिलीच शाळा असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील हजर दिनांक, सध्याच्या क्षेत्रातील हजर दिनांक व सध्याच्या शाळेतील हजर दिनांक एकच असेल.
१४. शेवटच्या बदलीचा दिनांक- शेवटी बदली जेव्हा झालेली असेल ते दिनांक नमुद करावा. अर्थातच सध्याच्या शाळेतील हजर दिनांक नमुद करावा याबाबत स्पष्ट सुचना प्राप्त झाल्यावर या स्तरावर बदल केला जाईल.
१५. शेवटच्या बदलीचा प्रकार- यामध्ये Inter District (अंतर जिल्हा) / Intra District (जिल्हांतर्गत) या पैकी एक लिहावे. प्रथमच नियुक्ती असेल तर NA लिहावे,
१६. शेवटच्या बदलीचा संवर्ग- शेवटच्या बदलीचा संवर्ग या रकाण्यात Cadre-1 (विशेष संवर्ग भाग १), Cadre-2 (पती-पत्नी एकत्रीकरण), Eligible (बदली पात्र / कुठलीही बदली सवलत नसलेले). Entitled (अवघड क्षेत्रातील बदली अधिकार पात्र) या पैकी एक लिहावे. पदोन्नतीने / समायोजनाने बदली झाली असल्यासही याच संवर्गातून होत असल्याने तेथेही हेच संवर्ग नमूद करावेत. प्रथमच नियुक्ती असल्यास NA लिहावे.
१७. बदली संदर्भात केंद्रप्रमुख / केंद्रसमन्वयक हे बदली प्रक्रियेबाबत अनुभवी व माहितगार असल्याने संबंधीत शिक्षकांना दुरूस्ती करण्यास मदत करावी व फॉर्म जमा करण्यापूर्वी ते तपासून घ्यावेत आणि केंद्रातील शिक्षकांनी या सूचनांप्रमाणे कार्यवाही केली आहे का याची खात्री झाल्यानंतरच केंद्राचे एकत्रीत फॉर्म कार्यालयात जमा करावेत.