शिक्षक बदली संवर्ग-१ व संवर्ग -२ मधील शिक्षकांसाठी लागणारे पुरावे यादी उपलब्ध teacher online transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक बदली संवर्ग-१ व संवर्ग -२ मधील शिक्षकांसाठी लागणारे पुरावे यादी उपलब्ध teacher online transfer 

➡️कर्मचाऱ्याचे संपूर्ण नांव

➡️धारण केलेल्या पदाचे नांव

➡️नोकरीचे सध्याचे ठिकाण, तालुका व जिल्हा

➡️कार्यरत जिल्हा परिषदेतील नेमणूकीचा दिनांक

➡️कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा

➡️कर्मचाऱ्यांच्या जातीचा प्रवर्ग. कर्मचारी अनुसूचित जमातीचा असल्यास कर्मचारी मागणी केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचीत जमातीचा आहे काय, असल्यास त्याचा तपशिल

➡️जिल्हा परिषदेमध्ये कायम अथवा अस्थायी

➡️कायम असल्यास कायम असल्याचा दिनांक

➡️कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी चालू आहे किंवा कसे, असल्यास, त्याबाबतचा दाखला जोडावा.

➡️कर्मचारी आंतरजिल्हा बदलीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यास इच्छुक आहे, त्या जिल्हा परिषदेचे नांव

➡️मा. सर्वोच्च न्यायालय/मा. उच्च न्यायालय/लोकायुक्त/अन्य न्यायाधीकरण/सक्षम प्राधिकरण यांनी बदलीसाठी आदेश दिला असल्यास त्या आदेशाचा दिनांक तसेच रिट याचिकेचा क्रमांक (मुंबई/नागपूर/औरंगाबाद)

➡️कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्यास त्याचा दिनांक

➡️कर्मचारी ज्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यास इच्छुक आहे त्या जिल्हा परिषदेने ना-हरकत प्रमाणपत्र दिले असल्यास त्याचा दिनांक

➡️विशेष संवर्ग भाग-१ मध्ये मोडत असल्यास त्याचा तपशील

➡️विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडत असल्यास जोडीदार ज्या जिल्हा परिषदेमध्ये/अन्य आस्थापनेवर कार्यरत असल्यास त्याचा तपशील

Join Now