शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांकरीता बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या यादया सादर करण्याबाबत teacher online transfer
संदर्भ :- १. ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- जिपब-४८२०/प्रक्र २९०/आस्था-१४ दि. ०७-०४-२०२१
२. शासनाचे पत्र क्रमांक न्यायाप्र/२०२४/प्रक्र-१०५/आस्था-१४/दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार पात्र शिक्षक सुधारीत धोरण दिनांक १८-०६-२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. मा. उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्रमांक २१६-२४ वरील दिनांक २५-१०-२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेकरीता विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश असल्याने त्यानुसार शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प. यवतमाळ अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२४-२५ करीता प्राथमिक शिक्षक संवर्गातील शिक्षक संवर्गाच्या बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार पात्र शिक्षक यांच्या विहीत केलेल्या प्रपत्रात पदनिहाय / विषयनिहाय (मराठी व उर्दू माध्यम) स्वतंत्र यादया Excel Font- DVOTT Surekh (हार्ड व सॉफटकॉपीसह) विशेष दुता मार्फत माहीती दिनांक २०-१२-२०२४ रोजी पर्यंत सादर करावी.
सहपत्र- विहीत प्रपत्र