जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याबातचे वेळापत्रकानुसार करावयाचे कार्यवाहीबाबत teacher online transfer
संदर्भ :- मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक न्यायाप्र-२०२४/ प्र.क्र.१०५/आस्था-१४/ दिनांक ७ नोव्हेंबर, २०२४.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणास कळविणेत येते की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यासाठीचे सुधारीत धोरण दिनांक १८.०६.२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्याची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल व्दारे राबविण्यात येते.
मा. उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र. २१६/२०२४ वरील दिनांक २५.१०.२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत येळापत्रकानुसार कार्यान्वित (Functional) असावे असे निर्देश दिलेले आहेत.
तदनुषंगाने आपणास असे कळविण्यात येते की यापुढे दरवर्षी राबविण्यात येणा-या जिल्हाअंतर्गत बदली प्रकियेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्येतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळामधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी सोबत संदर्भिय शासन पत्र जोडलेले आहे. त्यांचे अवलोकन होऊन अंक्र १ ते १० मध्ये नमुद केलेप्रमाणे विहीत कालावधीत उचित कार्यवाही आपले स्तरावरुन करणे यावी.
तसेच संदर्भिय शासन परिपत्रकामध्ये नमूद वेळापत्रक आपले स्तरावरुन सर्व शिक्षकांचे निदर्शनास
आणण्याची जबाबदारी आपली राहील तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरुन शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करणेत येईल याबाबतही संबधित शिक्षकांना आपले स्तरावरुन अवगत करणेत यावे उपरोक्त संदर्भिय पत्रात दिलेले शासन निर्देश व वेळापत्रकानुसार उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
👉👉जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बाबत परिपत्रक येथे पहा Click here