मुख्यालयी न राहिल्यामुळे ! शिक्षकांच्या पगारातून केले घरभाडे वसूल teacher hra news 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यालयी न राहिल्यामुळे ! शिक्षकांच्या पगारातून केले घरभाडे वसूल teacher hra news 

शेवगाव news- मुख्यालयात न राहता घरभाडे घेण्याचा  प्रकार शेवगाव तालुक्यातील पाच शिक्षकांच्या अंगलट आलेला आहे. शेवगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाचही शिक्षकांकडून घरभाडेपोटी घेतलेली सुमारे दहा लाखांची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिलेला आहे.

या विरोधात या शिक्षकांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे अपील केले होते. या प्रकरणाची सुनावणी पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे.

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे व नवीन शहरटाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयात रहात असलेले वर्षनिहाय ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेली घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी तक्रार अंत्रे येथील ज्ञानदेव सोलट यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी सखोल चौकशी करून तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यामुळे नवीन शहरटाकळी आणि ढोरसडे येथील पाच जिल्हा परिषद शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाविरोधात त्या पाचही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्या अपिलाची सुनावणी पूर्ण होऊन शिक्षकांनी मुख्यालयी रहात असलेल्या वर्षनिहाय ठराव सादर केलेले दिसून न आल्यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांचा आदेश कायम

ठेवून पाच शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसुलीचे आदेश दिलेले आहेत.

शासन निर्णयानुसार १९ सप्टेंबर २०१९ च्या आदेशाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्यालयात वास्तव्य करीत असला ग्रामसभेचा ठराव सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र, ढोरसडे, शहरटाकळी येथील शिक्षक मुख्यालयात न राहता घरभाडे व भत्ता घेत होते. वर्षापासून कारवाई होण्यासाठी लढा देत होतो, त्याला यश आले आहे.