या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेबाबत teacher eligibility test exam compalsary
अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेबाबत.
शासन शुध्दीपत्रक:-उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ मधील परिच्छेद क्र.२ मधील तीन वर्षाच्या कालावधीत” याऐवजी “पाच वर्षाच्या कालावधीत”, परिच्छेद क्र. ३ मधील ३ वर्षाच्या आत” याऐवजी “पाच वर्षाच्या कालावधीत” व परिच्छेद क्र.४ मधील “तीन वर्षाच्या कालावधीनंतर” याऐवजी “पाच वर्षाच्या कालावधीनंतर” असे वाचण्यात यावे.
०२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९२३१६०९३७९४२१ असा आहे.
हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.