शिक्षक भरतीतील ४ हजार ९३ उमेदवार रुजू teacher bharti 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
teacher bharti 2024
teacher bharti 2024

शिक्षक भरतीतील ४ हजार ९३ उमेदवार रुजू teacher bharti 2024

लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : शिक्षण विभागातर्फे पवित्र

संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत ४ हजार ४७४ उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. त्यातील ४ हजार ९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. आता उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भातील प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय शिफारशीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ११ हजार उमेदवारांची शिफारस फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, शिक्षण विभागाने भरतीबाबत निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयोगाने मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. आता विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

मुलाखतीचा टप्पा

मुलाखतीसह पदभरतीही गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत आणि अध्यापनकौशल्य यासाठी ३० गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

teacher bharti 2024
teacher bharti 2024
Join Now

Leave a Comment