शिक्षक मुलाखतीसह प्रथम यादी प्रसिद्ध शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक यादीची अधिकृत लिंक येथे पहा Tait exam teacher recruitment
दिनांक ०७/०८/२०२४
यादी पाण्यासाठी अधिकृत पोर्टल लिंक येथे पहा 👇👇👇
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. ‘मुलाखतीशिवाय’ या प्रकारातील १६७९९ या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
आता ‘मुलाखतीसह’ पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मध्ये एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसुत्रता (Uniformity) राखण्याच्यादृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा (SOP_Standard Operating Procedure) अवलंब करणेत येत असून यासाठी शासन पत्र दिनांक ०६/०८/२०२४ अन्वये मानक कार्यपद्धती (SOP Standard Operating Procedure) निश्चित केली आहे.
‘मुलाखतीसह’ पदभरती मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी/ इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक/शिक्षकांच्या ४८७९ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. १०९६ व्यवस्थापनातील ४८७९ रिक्त पदांसाठी
७८०५ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीतजास्त १० प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे.
नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव ११ शैक्षणिक
संस्थांच्या एकूण ४३ पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही. अशा शैक्षणिक
संस्थातील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.
सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा, निवडप्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत.
जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याचे दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
निवडप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
निवडप्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचेकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा / कागदपत्र सोबत जोडावेत. शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची शहानिशा तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा. संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारअर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपीलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.
ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शक रित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये
शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह’ या प्रकारातील सर्व साधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे pavitra2022grcc@gmail.comया ई-मेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ई-मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच
अन्य मागाँनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये.
मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.
• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.