“पवित्र २०२२- मुलाखतीशिवाय प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत tait exam interview 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“पवित्र २०२२- मुलाखतीशिवाय प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत tait exam interview 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये “पवित्र २०२२- मुलाखतीशिवाय प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत tait exam interview

विषय: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये “पवित्र २०२२- मुलाखतीशिवाय प्रणाली” अंतर्गत शिक्षक पदभरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

संदर्भ: पत्र क्रमांक 1408 दिनांक 215/02/2

२. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४

मधील दिनांक ०७/०३/२०२४ ३. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र. ४५३६/२०२३ मधील

ऑर्डर दिनांक 11/03/2024

4. सरकारी पत्र A. संकिर्ण-2024/P.Kr.184/TNT-1 दिनांक 19/04/2024.

५. समक्रमांकांचे पत्र क्र. २७७० दिनांक १९/०४/२०२४

शासकीय पत्र क्र. अरुंद-2024/Pr.178/Tienti-1. दि.०७.०६.२०२४

6. ७. शासकीय पत्र क्र. संकीर्ण-2024/प्रो.न.184/टियांटी-1, दिनांक 10.06.2024

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसंच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२” मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन निर्णयातील तरतुदी/विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.

संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासन पत्रातील तरतुदीनुसार जानेवारी, २०२४ मध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे व त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना शिफारसपात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक २५/०२/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्यास्तरावर सुरू करण्यात आलेली होती.

दरम्यानच्या कालावधीत लोकसभा-२०२४ च्या निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली होती. त्यानुषंगाने संदभी क्र.४ अन्वये त्या-त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिका-यांनी करण्याबाबत यापूर्वी या कार्यालयचे संदर्भ क्र.५ अन्यर्थ कळविण्यात आलेले आहे.

तद्नंतर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण, मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम दि.२४.०५.२०२४ रोजी घोषित झाल्याने सदर विभागात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे.

संदर्भ क.७ दि.१०.०६.२०२४ रोजीच्या शासन पत्रान्वये पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रीयेवर प्रभाव पडून आदर्श आचार संहितेचे उल्लघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेवून स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आलेली

आहे.

संदर्भ क.६ व ७ वरील तरतूदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या-त्या प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रुपांतरीत करुन गुणवतेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेवून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वास्तव आपल्या अधिनस्त यापूर्वी दि. २५.०२.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुकाया देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच पवित्र पोर्टलवर शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या लॉगीनवर दिलेल्या Applicant Joining Status या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रूजू अहवालाची नोंद पोर्टलवर करावी व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी,

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment