महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याबाबत syber protection
प्रस्तावना :-
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान), शासन निर्णय क्रमांक :- साटाफो-९३२५/प्र.क्र.१६/मातं हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, ४०००३२ दिनांक :- १७ जानेवारी, २०२५
महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याबाबत…
भारत सरकारने राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण २०१३ आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण २०२० अवलंबिले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेची झपाट्याने झालेली वाढ, शासन, नागरिक आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर, एआयची वाढ तसेच सायबर क्राइमची वाढ विचारात घेता, भारत सरकारच्या वरील धोरणाच्या आधारे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण, २०२५ विकसित करण्याकरिता टास्क फोर्स तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :-
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण विकसित करण्याकरिता संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे.
१) टास्क फोर्सची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
अ) सायबर सुरक्षा केंद्रित पायाभूत सुविधा (उदा.CSIRT ची स्थापना), व पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यासाठी शिफारस करणे.
ब) शासकीय उद्योग व नागरिकांच्या सहभागाने राज्यस्तरीय क्षमता निर्माण करणे.
क) कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण करणे,
ड) सायबर सुरक्षेच्या संशोधन व विकास कार्यक्रमास चालना देणे.
इ) उद्योग आणि स्टार्टअपला सहकार्य करणे,
ई) शासन, उद्योग, शैक्षणिक आणि ग्राहक नागरिक संस्था (उदा., हॅकाथॉन्स, कॉन्फरन्स, जागरूकता कार्यक्रम) यांच्यामध्ये व्यापक सायबर सुरक्षा क्षमता व लवचिकता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी आणि कार्यक्रमांवर शिफारशी करणे.
3) भारत सरकारच्या उपक्रमांची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणीसाठी शिफारस करणे (उदा.,
सायबर स्वच्छता केंद्र, सुरक्षित भारत अभियान)
२) वरील कार्यकक्षेनुसार टास्क फोर्सने ३ महिन्यात शासनास शिफारशी सादर कराव्यात.
पृष्ठ ३ पैकी २
शासन निर्णय क्रमांकः साटाफो-९३२५/प्र.क्र.१६/मातं
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा साकेतांक २०२५०११७१०५०२५६१०७ असा आहे. हा आदेश डीजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.