स्वामी विवेकानंद जयंती छोटे मराठी भाषण swami vivekananda jayanti bhashan
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला आज अशा महान व्यक्तिमत्त्वाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती मी तुम्हाला महान व्यक्तिमत्व असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल दोन शब्द सांगणार आहे. 12 जानेवारी 1863 ला कोलकता येथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध व नामांकित वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही बुद्धीवान आणि सात्विक स्त्री होती.
स्वामी विवेकानंदाची आई, कथा खूप सांगत असे. रामायण महाभारत या महाकाव्यातील कथा आणि पुराणातील कथा नरेंद्राना आईकडूनच समजल्या होत्या. स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच प्रर बुद्धिमत्तेचे होते. स्वामी विवेकानंद यांनी इतिहास, विज्ञान, कला, साहित्य, वेद, पुराण, रामायण, महाभारत यांचा भरपूर अभ्यास केला. स्वामी विवेकानंद हे फक्त अभ्यासात व वेदांतात हुशार होतेच त्याच बरोबर, तर ते खेळ, शारीरिक शिक्षण व व्यायामातही कुशल होते.
स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस हे होते. १८८५ मध्ये रामकृष्ण परमहंस खूप आजारी असताना स्वामी विवेकानंदांनी त्यांची मनापासून सेवा केली, पण दुर्देवाने परमहंसाचा मृत्यू झाला आपल्या पूजनीय गुरुच्या मृत्युनंतर स्वामी विवेकानंदानी जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केले.
रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. स्वामी विवेकानंदांनी जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. हिंदूधर्माच्या तत्वज्ञानाची ओळख जगाला करून देणे हे या मिशनचे प्रमुख कार्य होते. या मिशनने अनेक ठिकाणी रुग्णालये, अनाथाश्रम व वसतिगृह उभारून समाजसेवेचे अनमोल कार्य हाती घेतले. होते.
सांगून प्रभावित करण्याचे कार्य सर्वप्रथम स्वामी CC विवेकानंदांनीच केले. त्यानंतर स्वामीजींनी प्रत्यक्ष सेवाकार्याला वाहून नेण्याचा संकल्प केला. त्यासाठी समर्पणवृत्तीने कार्य करणाऱ्या चारित्र्यसंपन्न, सेवाभावी युवकांचा एक संघ त्यांनी गठित केला. भगवान रामकृष्णांच्या, देशविदेशातील सर्व शिष्यांना एकत्र आणून ‘श्री रामकृष्ण मिशन’ची स्थापना करण्याचा विचार स्वामी विवेकानंदांनी जाणले.
आणि लगेच सर्वांनी तो मान्य केला. स्वामीजींच्या प्रेरणादायी व्याख्यानानंतर 1 मे, 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. ‘ज्ञान, उपासना आणि सेवा’ या कार्याला वाहून घेण्याचा संकल्प सर्वांनी केला. मानवजातीचे कल्याण हा त्या संस्थेचा प्रमुख उद्देश ठरला.