“चांगल्या कर्माचा परतावा चांगलाच मिळतो” सुंदर मराठी बोधकथा sundar marathi moral stories
एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे .
तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल .
तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे .
तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले ” हे मी काय करतेय?” असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली .
नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला ” तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. ”
तो चपाती घेऊन गेला .
तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला ” आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे.
हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.
आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.
‘ तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगल कर्म तुमच्याकडे परत येतं.’
तात्पर्य – चांगल्या कर्माचा परतावा चांगलाच मिळतो.