उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करणे बाबत summer day school timetable
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सध्या मार्च महिना सुरु असून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आरोग्यविषयक समस्या उदभवू नये व विद्यार्थी यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेबाबत दिनांक 04-03-2025 पासून खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
1. एका सत्रात भरणा-या शाळांची वेळ सकाळी 8.30 ते 1.00 वा पर्यंत राहील.
2. शाळांची मघली सुटटी 30 मिनिटांची असेल (11.00 ते 11.30 वा.पर्यंत)
3. दुबार पध्दतीने भरणा-या शाळांनी वेळ निश्चित करुन कार्यालयीन तास पुर्ण करण्याच्या अनुषंगाने मुख्याध्यापक यांनी नियोजन करुन गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात यावे.
4. आर.टी.ई.अधिनियम 2009 नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बदल होणार नाही.
5. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेशी संबंधित वेळापत्रक अंतिम करुन गटशिक्षणाधिकारी संबंधित तालुका यांना सादर करावे.
6. शासन निर्णय दिनांक 29 एप्रिल 2011 नुसार शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे यासाठी विहीत केलेल्या निर्देशतत्वाचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व शाळा मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी.
7. सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी विहीत केलेल्या वेळेमध्ये शाळा चालविली जात असल्याची नियमित खात्री करावी.