राज्यातील मान्यताप्राप्त शाळांसाठी या कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे sudharit akrutibandh shasan nirnay
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे.
संदर्भ :
– १) माध्यमिक शाळा संहितेतील शिक्षकेतर कर्मचा-यांचे निकष.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२६९४/१७९०/ (१६४)/माशि-२, दिनांक २८ जून, १९९४
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएसएन-६०३/(४१/०३)/माशि-२, दिनांक २५ नोव्हेंबर, २००५
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दिनांक २३ ऑक्टोबर, २०१३
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/सं.क्र.१०/१५/टीएनटी-२, दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दिनांक १८ मे, २०१५
प्रस्तावना :-
राज्यामधील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचा-यांच्याबाबत निकष संदर्भाधीन क्र.१ येथील माध्यमिक शाळा संहितेमध्ये संकलित स्वरुपात विहीत करण्यात आलेले आहेत. या निकषामध्ये संदर्भाधीन क्र.२, ३ व ४ येथील शासन निर्णयांन्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या आकृतीबंधास संदर्भाधीन क्र.५ येथील शासन निर्णयान्वये शासनाने स्थगिती दिलेली असून सदर संदर्भाधीन क्र.५ येथील शासन निर्णयान्वये शिक्षकेतर कर्मचा-यांची पदे निश्चित करण्यासाठी आयुक्त, शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. उक्त समितीने दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशी समितीने सदर अहवालात सुचविलेल्या आहेत. आयुक्त समितीच्या शिफारशी व यापूर्वी गठित करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती, गोगटे समिती व संदर्भाधीन क्र.४ येथील दि.२३ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयानुसार तत्कालीन उच्चस्तरीय सचिव समितीने ठरवून दिलेली पदे यांचा विचार करुन शिक्षकेतर पदांचा सुधारित आकृतीबंध उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता. उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीने शिक्षकेतर पदाचा आकृतीबंध निश्चित करण्याचा निर्णय दि.१३ नोव्हेंबर, २०१८ रोजीच्या बैठकीमध्ये घेतला. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व खाजगी
अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यासंदर्भातील यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित आकृतीबंध लागू करण्यात येत आहे:
(१) लिपिकवर्गीय पदे :-
खालील तक्ता पहा
(५) चतुर्थश्रेणी कर्मचारी :-
चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पदांसंदर्भातील आकृतीबंधाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
३. वरील निकषानुसार अतिरिक्त होणारी शिक्षकेतर कर्मचा-यांची पदे त्याच संस्थेत सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील, अथवा अतिरिक्त कर्मचा-यांच्या सेवा नजिकच्या शासकीय/जिल्हा परिषद कार्यालयांत/अनुदानित/अंशतः अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येतील. सदर कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील.
४. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.७०३/आपुक, दि.२६.१२.२०१८ अन्वये वित्त विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०१२८१७४२०७८७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रति,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.