राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास समिति study of NPS and OPS 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास समिति study of NPS and OPS 

शासन निर्णय :-राज्य शासनाच्या सेवेत दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS) लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१) श्री. सुबोध कुमार, भा.प्र.से. (सेवानिवृत्त)

२) श्री.के.पी. बक्षी, भा.प्र.से. (सेवानिवृत्त)

३) श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव, भा.प्र.से (सेवानिवृत्त)

४) समितीचे सचिव संचालक, लेखा व कोषागारे

२. सदर समितीने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना

सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबतची

शिफारस/अहवाल शासनास ३ महिन्यात सादर करावा.

Study of NPS and ops
Study of NPS and ops

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३१४२००३१३६८०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

2 thoughts on “राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास समिति study of NPS and OPS ”

Leave a Comment